गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 09:44 IST2025-12-14T09:42:28+5:302025-12-14T09:44:08+5:30
'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाली आहे. गायत्री दातारने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.

गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
सध्या मराठी कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. पूजा बिरारी-सोहम बांदेकर, प्राजक्ता गायकवाड, तेजस्विनी लोणारी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने प्रेमाची कबुली दिली आहे. 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाली आहे. गायत्री दातारने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे.
गायत्री दातारने तिच्या हिरोसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने साखरपुडा झाल्याचंही सांगितलं आहे. साखरपुड्याची अंगठी अभिनेत्रीने फ्लॉन्ट केली आहे. "माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झाली आहे. हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस आहे", असं कॅप्शन गायत्रीने या फोटोला दिलं आहे. ११ डिसेंबरला गायत्री साखरपुडा केला आहे. लवकरच अभिनेत्री लग्नाच्या बेडीतही अडकणार आहे. गायत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्याचं नावही अभिनेत्रीने गुलदस्त्यात ठेवलं आहे.
गायत्रीच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. 'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्री दातारने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'अबीर गुलाल' मालिकेत ती दिसली होती. 'बिग बॉस मराठी' आणि 'चल भावा सिटीत' या रिएलिटी शोमध्ये गायत्रीने सहभाग घेतला होता.