'बरकत' फेम अमोल नाईकने केलं लेकीचं बारसं! ठेवलंय 'हे' नाव; 'राणादा'शी आहे खास कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 09:27 IST2026-02-20T09:25:32+5:302026-02-20T09:27:39+5:30

'तुझ्यात जीव रंगला' मालिका खूप गाजली. या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेम केलं. मालिकेतील अंजली आणि राणादा यांची खास केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. अशातच 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील बरकत अर्थात अभिनेता अमोल नाईकने मुलीचं बारसं केलं आहे.

tujhyat jiv rangla actor Amol Naik has given his daughter a special name hardik joshi attend | 'बरकत' फेम अमोल नाईकने केलं लेकीचं बारसं! ठेवलंय 'हे' नाव; 'राणादा'शी आहे खास कनेक्शन

'बरकत' फेम अमोल नाईकने केलं लेकीचं बारसं! ठेवलंय 'हे' नाव; 'राणादा'शी आहे खास कनेक्शन

'तुझ्यात जीव रंगला' मालिका खूप गाजली. या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेम केलं. मालिकेतील अंजली आणि राणादा यांची खास केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. अशातच 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील बरकत अर्थात अभिनेता अमोल नाईकने मुलीचं बारसं केलं आहे. अमोलच्या बारश्याला राणादा अर्थात हार्दिक जोशी उपस्थित होता. अमोलने लेकीचं खास नाव ठेवलं आहे. विशेष म्हणजे या नावाचं हार्दिकशी कनेक्शन आहे.

बरकतच्या लेकीचं नाव काय?

अमोलने सोशल मीडियाच्या माध्यमातून लेकीच्या बारश्याचे फोटो पोस्ट करुन नावाचा उलगडा केलाय. ''आज आमच्या घरात आनंदाचा सगळ्यात गोड सोहळा… आमच्या छोट्या राजकुमारीचं बारसं.. Aakshaya – नाव जसं अर्थपूर्ण, तसंच आमचं तिच्यावरचं प्रेम अखंड आणि अनंत... तिच्या छोट्या पावलांनी घरात सुख, हसू आणि आशीर्वाद भरून गेले... आजपासून तिचं नाव फक्त ओळख नाही….. तर आमच्या आयुष्याचं सर्वात सुंदर स्वप्न आहे... Aakshaya– आमची forever sparkle,
आमचा अभिमान, आमचं संपूर्ण जग ” अक्षया अमोल नाईक...  तुम्हा सर्वांचा आशीर्वाद कायम जसा माझ्या सोबत आहे, तसाच माझ्या "अक्षया" सोबत ही राहूदे.''

अशी पोस्ट लिहून अमोलने लेकीच्या नावाचा उलगडा केलाय. विशेष म्हणजे हार्दिक जोशीच्या पत्नीचं नावही अक्षया आहे. अमोल आणि अक्षया यांनी 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत एकत्र कामही केलं आहे. तेव्हापासून अमोलचे हार्दिक आणि अक्षयाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे अमोलने लेकीचं नाव अक्षया ठेवताच सर्वांना आनंद झाला आहे. अमोलच्या लेकीच्या बारश्याला हार्दिक जोशीसह सिद्धार्थ जाधव, स्वाती लिमये हे कलाकार सहभागी झाले होते.

Web Title : 'बरकत' अमोल नाइक ने बेटी का नाम अक्षया रखा, 'राणादा' से जुड़ाव।

Web Summary : 'बरकत' के नाम से मशहूर अमोल नाइक ने अपनी बेटी अक्षया का नामकरण किया। अक्षया नाम अभिनेता हार्दिक जोशी और उनकी पत्नी से जुड़ा है। हार्दिक और 'तुझ्यात जीव रंगला' के अन्य सितारे शामिल हुए।

Web Title : 'Barkat' Amol Naik names daughter Akshaya, connects with 'Ranada'.

Web Summary : Amol Naik, known as 'Barkat,' celebrated his daughter Akshaya's naming ceremony. The name Akshaya connects to actor Hardik Joshi and his wife. Hardik and other 'Tujhyat Jeev Rangala' stars attended.