तुझ्यात जीव रंगला...! लग्नाआधीच राणादा व पाठकबाईंचं लंडन व्हॅकेशन, पाहा रोमॅन्टिक VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 18:01 IST2022-07-10T18:00:00+5:302022-07-10T18:01:04+5:30
Akshaya Deodhar, Hardeek Joshi : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांची बातच न्यारी. सध्या काय तर हे कपल लंडनमध्ये एकमेकांसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे.

तुझ्यात जीव रंगला...! लग्नाआधीच राणादा व पाठकबाईंचं लंडन व्हॅकेशन, पाहा रोमॅन्टिक VIDEO
Akshaya Deodhar, Hardeek Joshi : ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी (Hardeek Joshi) व अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांची बातच न्यारी. पडद्यावरची ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र यावी, अशी चाहत्यांची भरून इच्छा होती. चाहत्यांची ही इच्छा अखेर पूर्ण झाली. अक्षया व हार्दिकने अचानक साखरपुडा करत, चाहत्यांना सुखद धक्का दिला. साखरपुडा झाल्यानंतर हे जोडपं सतत चर्चेत आहे. कधी एकमेकांसोबतच्या रोमॅन्टिक व्हिडीओमुळे तर कधी फोटोंमुळे. सध्या काय तर हे कपल लंडनमध्ये एकमेकांसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे.
इन्स्टा स्टोरीवर दोघांनी लंडनमधील एक रोमॅन्टिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही लंडनच्या रस्त्यावर अतिशय रोमँटिक अंदाजात पोज देताना दिसून येत आहेत.
अक्षया आणि हार्दिकच्या लंडन व्हेकेशनचा हा रोमॅन्टिक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. कपलचा अंदाज चाहत्यांना प्रचंड पसंत पडला आहे.
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अंजली बाई आणि राणादा या ऑनस्क्रीन जोडीला खूप लोकप्रियता मिळाली होती. ही ऑनस्क्रीन जोडी आता आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत एंगेज झाली आहे. अक्षया आणि हार्दिक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पुण्यात त्याचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. नुकतंच दोघांनी ‘चला हवा येऊ द्या’मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा लग्न कधी आणि कुठे करणार असा प्रश्न विचारल्यानंतर दोघेही पुण्यात लग्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लग्नाची तारीख मात्र अद्या गुलदस्त्यात आहे.