...आणि काय हवं! अभिनेत्री अमृता पवारचा होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमॅन्टिक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 17:42 IST2022-04-25T17:41:16+5:302022-04-25T17:42:08+5:30
अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar) हिचा 4 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता. आता तिच्या साखरपुड्याचा रोमॅंटिक व्हिडिओ समोर आला आहे.

...आणि काय हवं! अभिनेत्री अमृता पवारचा होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमॅन्टिक व्हिडीओ
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa ) या मालिकेतील अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar) हिला खऱ्या आयुष्यात जोडीदार मिळाला आहे. इंजिनिअर असलेल्या नील पाटीलला अमृतानं जोडीदार म्हणून निवडलं आहे. गेल्या 4 एप्रिल रोजी अमृता व नीलचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला हेता. तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तिच्या साखरपुड्याचा रोमँटिक व्हिडिओ समोर आला आहे. शिवाय होणाऱ्या नवऱ्यासोबत रोमॅन्टिक राईडचा तिचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
खुद्द अमृताने हे रोमँटिक व्हिडिओ शेअर केले आहेत. कपलच्या या रोमँटिक व्हिडिओवर चाहत्यांकडून भरभरून कमेंट्स केल्या आहेत. दोघांचाही रोमँटिक अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत आई बाबा आणि आईची लाडकी लेक अशा त्रिकोणी कुटुंबातून ५० जणांच्या कुटुंबात लग्न होऊन आलेल्या अदितीची भूमिका अमृता साकारते आहे. सध्या एकत्र कुटुंब पद्धती हरवत चालली असताना ती टिकवून कशी ठेवता येईल हा संदेश घेऊन आलेली ही मालिका आदिती आणि सिद्धार्थ यांच्या वेगवेगळ्या कौटुंबिक विश्वावर आधारित आहे. या मालिकेत अमृताने आदितीची भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’या मालिकेव्यतिरिक्त अमृताने स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.
अमृता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीए अंतर्गत लेखापाल म्हणून काम करत होती. यानंतर तिनं अभिनेत्री म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात दुहेरी या मराठी मालिकेतून केली.