तितीक्षा-सिद्धार्थ अडकले लग्नाच्या बेडीत! अक्षता पडताच अभिनेत्री झाली भावुक, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 14:36 IST2024-02-26T14:34:08+5:302024-02-26T14:36:28+5:30
Titeeksha Tawde-Siddharth Bodke Wedding : तितीक्षा-सिद्धार्थने बांधली लग्नगाठ! पहिला व्हिडिओ समोर

तितीक्षा-सिद्धार्थ अडकले लग्नाच्या बेडीत! अक्षता पडताच अभिनेत्री झाली भावुक, व्हिडिओ व्हायरल
शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरे, प्रथमेश परब- क्षितीजा घोसाळकरनंतर आता आणखी एक सेलिब्रिटी कपल विवाहबंधनात अडकलं आहे. तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तितीक्षा आणि सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकले. सात फेरे घेत त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नातील खास क्षणांचा व्हिडिओ समोर आला आहे.
तितीक्षा आणि सिद्धार्थने आयुष्यातील या खास क्षणासाठी मराठमोळा पेहराव केला होता. सिद्धार्थने बिस्किट रंगाचा कुर्ता सेट परिधान केला होता. तर नऊवारी साडीत तितीक्षाचं सौंदर्य खुलून आलं होतं. त्यांच्या लग्नातील व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत तितीक्षा आणि सिद्धार्थ एकमेकांना हार घालताना दिसत आहे. तर हार घातल्यानंतर तितीक्षा भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
रविवारी सिद्धार्थ आणि तितीक्षाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांच्या हळदीचे फोटो व्हायरल झाले होते. केळवणाचा फोटो शेअर करत तितीक्षा आणि सिद्धार्थने लग्न करणार असल्याची बातमी दिली होती. तितीक्षा आणि सिद्धार्थने 'तू अशी जवळी राहा' मालिकेत एकत्र काम केलं होतं. सध्या तितीक्षा 'सातव्या मुलीची सातवी गोष्ट' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सिद्धार्थने मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. अजय देवगणच्या 'दृश्यम २' या सिनेमातही तो झळकला होता.