या कारणामुळे पूजानं मेहंदी सोहळ्यात हातावर काढलं कुत्र्याचं चित्र, आदेश बांदेकरांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 10:22 IST2025-12-06T10:21:59+5:302025-12-06T10:22:34+5:30
Soham Bandekar And Pooja Birari :आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने २ डिसेंबर, २०२५ रोजी अभिनेत्री पूजा बिरारी सोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाच्या विधींचे आणि लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

या कारणामुळे पूजानं मेहंदी सोहळ्यात हातावर काढलं कुत्र्याचं चित्र, आदेश बांदेकरांनी केला खुलासा
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने २ डिसेंबर, २०२५ रोजी अभिनेत्री पूजा बिरारी सोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाच्या विधींचे आणि लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पूजाने मेहंदी कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी तिच्या हातावरील मेहंदीवरील कुत्र्याच्या चित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. तिला अनेकांनी त्यावरून ट्रोलही केलं. दरम्यान आता आदेश बांदेकर यांनी त्या फोटोमागचे कारण सांगितलं.
मेंहदी सोहळ्यात पूजा बिरारीने हातावर कुत्र्याचे चित्र काढले होते. त्या चित्रामागचं भावनिक कारण नुकतेच आदेश बांदेकर यांनी सांगितले. पूजाच्या हातावर असणारा कुत्रा म्हणजे ' सिंबा आदेश बांदेकर ' होय. सिंबा हे आदेश बांदेकर यांच्या कुत्र्याचं नाव आहे. खरेतर सिंबा बांदेकर यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. कारण सोहम लहान असतानाच सिंबाचं बांदेकर कुटुंबात आगमन झालं होतं. आता तो १७ वर्षांचा आहे. तो थोडा थकला असल्यामुळे त्याला चालायला फारसं जमत नाही. पण घरात त्याची खूप काळजी घेतली जाते. सोहमच्या बेडवरच त्याला झोपायचं असतं.
सोहमने त्याच्या लग्नातही सिंबाला आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याला तो प्रवास आणि वावर त्रासदायक ठरला असता. पूजाला देखील सिंबाचा लळा लागल्यामुळे तिने तिच्या हातावर सिंबाचं चित्र काढलं होतं, असं आदेश बांदेकर यांनी सांगितले.