'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील या कलाकाराला मिळाला Gobal Icons Award, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 15:05 IST2022-07-22T15:01:15+5:302022-07-22T15:05:06+5:30
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील सर्व पात्रांना रसिकांची खूप पसंती मिळताना दिसते. आता या मालिकेतील एका कलाकाराने Gobal Iconsचा पुरस्कार पटकावला आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील या कलाकाराला मिळाला Gobal Icons Award, फोटो व्हायरल
स्टार प्रवाह वाहिनवरील मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ला अल्पावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील गौरी आणि जयदीपची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते आहे. तसेच या मालिकेतील इतर पात्रांनाही रसिकांची खूप पसंती मिळताना दिसते. माई, शालिनी, देवकी या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. गौरी आणि जयदीपला अडचणीत टाकणाऱ्या शालिनीची भूमिका माधवी निमकर साकारते आहे. विशेष म्हणजे खलनायिकी भूमिका साकारुनही माधवी लोकप्रिय झाली आहे.
माधवी निमकर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर माधवीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शालिनीला नुकताच Gobal Icons Awardvने सन्मानित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर माधवीने पुरस्कारासोबतचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. माधवीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
. माधवीला अभिनयासोबत फिटनेसचेही आवड आहे. खऱ्या आयुष्यात प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. फिट राहण्यासाठी माधवी नियमित योगा करते. माधवीच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोज तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.अनेक वर्षांपासून माधवी नियमितपणे योगाभ्यास करत आहे.
माधवीने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं. यातही तिने 'अवघाची संसार', 'जावई विकत घेणे', 'स्वप्नांच्या पलीकडे' या मालिकांमध्ये काम केलं. तर 'संघर्ष', 'नवरा माझा भवरा', 'सगळं करून भागलं', 'धावाधाव', 'बायकोच्या नकळत' या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.