"मग दृष्ट कोणी लावली?", आजारपणातून बरी झाल्यानंतर जान्हवीचा सवाल, नेटकरी म्हणाले - छोटा पुढारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:02 IST2025-12-05T12:01:26+5:302025-12-05T12:02:01+5:30
Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने नेटकऱ्यांना दृष्ट कोणी लावली असेल, असा सवाल केला आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

"मग दृष्ट कोणी लावली?", आजारपणातून बरी झाल्यानंतर जान्हवीचा सवाल, नेटकरी म्हणाले - छोटा पुढारी
'बिग बॉस मराठी सीझन ५' चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण नुकताच संजना गोफणेसोबत लग्नबेडीत अडकला. त्याच्या लग्नात जान्हवी किल्लेकर त्याची करवली बनली होती आणि ती लग्नात धमाल करताना दिसली. मात्र लग्नानंतर जान्हवीला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यावेळी तिने हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत दृष्ट लागल्याचं म्हटलं होतं. आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून आता ती बरी आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिने नेटकऱ्यांना दृष्ट कोणी लावली असेल, असा सवाल केला आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती म्हणते आहे की, ''नुकतंच मी एका फोटोला कॅप्शन दिलं होतं की, नजर इज रिअल. आणि सगळ्यांचं पण तेच म्हणणं होतं की दृष्ट लागली...दृष्ट लागली... .दृष्ट लागली... पण सगळ्यांचं तर माझ्यावर खूप प्रेम आहे. सगळ्यांचे आशीर्वादही माझ्यासोबत आहेत. मग दृष्ट कोणी लावली..? तुम्हाला काय वाटतं कोणी दृष्ट लावली असेल? कमेंट करा.'' तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
जान्हवी किल्लेकरच्या मग दृष्ट कोणी लावली..? या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. काहींनी तर थेट छोटा पुढारी घनश्याम दरोडेचं नाव घेतलंय. तर एकाने म्हटलं की, ''आई शपथ माझा काही संबंध नाही.'' दुसऱ्याने लिहिले की, ''CID चौकशी करावे लागेल ACP प्रद्युमन सांगावे लागेल काही तरी गडबड आहे दया.'' आणखी एकाने लिहिले की, ''अगं ताई तुला दुष्ट नाही लागली तू खूप धावपळ केल्यामुळे तुला ते अशक्तपणा जाणवला असेल दुष्ट वगैरे काही नसतं.''