यशच्या आई-वडिलांच्या मृत्युचं सत्य येणार समोर; विश्वजीत काका सांगणार घडलेला प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 18:48 IST2022-03-28T18:47:11+5:302022-03-28T18:48:40+5:30

Mazi tuzi reshimgath: आता कुठे त्यांची लव्हस्टोरी खुलत होती. मात्र, या स्टोरीमध्ये पुन्हा मीठाचा खडा पडला आहे.

The truth about the death of Yash parents will come out Uncle Vishwajeet will tell about the incident | यशच्या आई-वडिलांच्या मृत्युचं सत्य येणार समोर; विश्वजीत काका सांगणार घडलेला प्रसंग

यशच्या आई-वडिलांच्या मृत्युचं सत्य येणार समोर; विश्वजीत काका सांगणार घडलेला प्रसंग

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत यश आणि नेहा यांच्या नात्यात पुन्हा चढउतार आल्याचं दिसून येत आहे. आता कुठे त्यांची लव्हस्टोरी खुलत होती. मात्र, या स्टोरीमध्ये पुन्हा मीठाचा खडा पडला आहे. नेहाचं पहिलं लग्न झाल्याचं सत्य आजोबांसमोर आलं आहे. त्यामुळे सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. या सगळ्या परिस्थितीत यश टेन्शनमध्ये असतानाच एकीकडे परी घर सोडून निघून जाते. तर दुसरीकडे यशसमोर त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूमागचं खरं कारण येणार आहे. त्यामुळे या मालिकेत एकावर एक रंजक ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये विश्वजीत काका यशला त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूचं भयान वास्तव सांगणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून विश्वजीतने मनात लपवून ठेवलेलं दु:ख तो यश समोर मांडून त्याची घुसमट कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, हे सत्य ऐकल्यावर यशच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.

दरम्यान, यशच्या आई-वडिलांचा मृत्यू नेमका कसा झाला हे जाणून घेण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. मात्र, हे सत्य येत्या काही भागांमध्येच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: The truth about the death of Yash parents will come out Uncle Vishwajeet will tell about the incident