Kapil Sharma : फुल ऑन स्वॅग! कपिल शर्माचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, पाहून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 17:46 IST2022-08-21T17:46:05+5:302022-08-21T17:46:26+5:30
Kapil Sharma : कपिलने आपला नवा लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोत कपिलची हेअरस्टाईल बदलली आहे. फिटनेसवरची त्याची मेहनतही स्पष्ट दिसतेय.

Kapil Sharma : फुल ऑन स्वॅग! कपिल शर्माचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, पाहून थक्क व्हाल
‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शो. आता छोट्या पडद्यावरचा हा लोकप्रिय शो नव्या रूपात, नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. होय, ‘द कपिल शर्मा शो’चा नवा सीझन लवकरच येतोय. या शोमध्ये कपिल शर्मा (Kapil Sharma ) नव्या चेहऱ्यांसोबत वापसी करतोय. विशेष म्हणजे, कपिलही या शोमध्ये ‘नवा’ होऊन परतला आहे. कपिल या सीझनमध्ये एकदम नव्या लुकमध्ये दिसणार आहे.
कपिलने आपला नवा लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कपिलने आपल्या नव्या लुकचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत कपिलची हेअरस्टाईल बदलली आहे. फिटनेसवरची त्याची मेहनतही स्पष्ट दिसतेय. कपिलची नवी हेअरस्टाईल एकदम सुपर कुल आहे. त्याचा हा फुल ऑन स्वॅग लुक पाहूनही तुम्हीही व्वा म्हटल्याशिवाय राहणार नाही.
या फोटोत कपिल आधीपेक्षा अधिक फिट दिसतोय. म्हणजेच त्याने आपलं वजन बरंच घटवलं आहे. खास बात म्हणजे, कपिलचा हा लुक त्याची बायको गिन्नी चतरथने स्टाईल केला आहे.
‘द कपिल शर्मा शो’मध्ये बॉलिवूडचे दिग्गज कलाकार प्रमोशनसाठी येतात. कपिल शर्मा,कृष्णा अभिषेक,भारती सिंह,किकू शारदा हे कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
येतोय नवा सिनेमा
कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. होय, दोन चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर कपिल शर्माचा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याने नुकतीच आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात कपिल शर्मा फूड डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे.
नंदिता दासच्या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात तो दिसणार आहे. कपिल शर्मा त्याच्या नवीन चित्रपटात फूड डिलिव्हरी रायडरच्या भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाचे शूटिंग मार्चमध्ये सुरू होईल, त्यासाठी कलाकार भुवनेश्वर, ओडिशा येथे जाणार आहेत.