'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्री झाली कॅमेरासमोर बोल्ड; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 16:02 IST2023-08-20T16:01:35+5:302023-08-20T16:02:10+5:30
Shivali Parab: शिवालीने अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्री झाली कॅमेरासमोर बोल्ड; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवाली परब (Shivali Parab). सध्याच्या घडीला तिला कोणी ओळखत नाही असा एकही व्यक्ती नाही. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे तिच्या उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्याचीही नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगत असते. यात अलिकडेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची बोल्ड झाल्याचं दिसून येत आहे.
शिवाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम नेटकऱ्यांच्या भेटीला येत असते. यात अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला असून यात ती कमालीची बोल्ड दिसत आहे. इतकंच नाही तर नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये शिवाली वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसत असून तिने या व्हिडीओसाठी काही बोल्ड पोझ दिल्या आहेत. जे पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. महाराष्ट्र गाजवणारी शिवाली कल्याणला लहानाची मोठी झाली आहे. शिवालीने तिचं शिक्षण शिवालीचा श्रीमती वेणूबाई अंबोपावशे या शाळेमध्ये घेतलं. शाळेत असल्यापासून तिला नृत्य आणि अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना शिवालीने अनेक फेस्टिवल गाजवले आणि तिथूनच शिवालीने अभिनयाला सुरुवात केली. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये दिसली.