डोंबिवली स्टेशनवर भेट ते १५ दिवसांत लग्नाची मागणी! 'ठरलं तर मग' मधील अर्जुनच्या पत्नीला पाहिलंत का? पोस्ट शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:57 IST2026-02-23T15:54:16+5:302026-02-23T15:57:16+5:30

"माझ्या आयुष्याची खरी हिरोईन...",लग्नाच्या वाढदिवसानिमित्त'ठरलं तर मग' मधील अर्जुनने पत्नीसाठी लिहिली पोस्ट

tharla tar mag fame amit bhanushali share special post for wife shraddha on the occasion of their wedding anniversary  | डोंबिवली स्टेशनवर भेट ते १५ दिवसांत लग्नाची मागणी! 'ठरलं तर मग' मधील अर्जुनच्या पत्नीला पाहिलंत का? पोस्ट शेअर करत म्हणाला...

डोंबिवली स्टेशनवर भेट ते १५ दिवसांत लग्नाची मागणी! 'ठरलं तर मग' मधील अर्जुनच्या पत्नीला पाहिलंत का? पोस्ट शेअर करत म्हणाला...

Amit Bhanushali: छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेली ३ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. इतकंच नाहीतर टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका अव्वल स्थानवर असते. या मालिकेतील सगळेच कलाकार आता घराघरांत पोहोचले आहेत. दरम्यान, ठरलं तर मग मधील सायली अर्जुनच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.  या मालिकेमध्ये अभिनेता अमित भानुशालीनं अर्जुनची भूमिका साकारली आहे. अमितच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळतंय. सध्या हा अभिनेता सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अमित भानुशाली वैयक्तिक आयुष्यात विवाहित आहे. श्रद्धा असं त्याच्या पत्नीचं नाव असून या जोडप्याला एक मुलगा देखील आहे. दरम्यान, आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अमित पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेते आहे. अमितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहून त्यामध्ये म्हटलंय, २०१४- हिरो बनण्याचं स्वप्न होतं. तेव्हा खिशात पैसे नव्हते पण, मनात जिद्द मात्र कायम होती. या प्रवासात माझ्यासोबत होती माझी हिरोईन. आज माझ्या हातात मला मिळालेल्या पुरस्कारांची ट्रॉफी आहे. पण, खरं तेव्हाच जिंकलो होतो जेव्हा तू माझी जोडीदार म्हणून निवड केली होतीस. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा... माझ्या आयुष्याची खरी हिरोइन...",अशा आशयाची सुंदर पोस्ट अमितने शेअर केली आहे. 

अशी आहे अभिनेत्याची लव्हस्टोरी...

अमित आणि श्रद्धाची लव्हस्टोरीदेखील अशीच हटके आहे. दोघांची पहिली भेट डोंबिवली स्टेशनवर झाली होती. श्रद्धा लेडीज कपार्टमेंटमध्ये तर अमित जनरल डब्यात चढला होता.श्रद्धाने घरी गेल्यानंतर फेसबुकवर अमितला तुझं काम आवडतं असा मेसेज केला होता. तेव्हा अमित 'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेत काम करत होता. त्यानंतर १५ दिवसांच्या डेटिंगनंतर अमितने श्रद्धाला थेट लग्नाचीच मागणी घातली. आता त्यांना एक मुलगा आहे.

Web Title : डोंबिवली स्टेशन पर मुलाकात और 15 दिनों में शादी का प्रस्ताव!

Web Summary : 'ठरला तर मग' के अर्जुन अमित भानुशाली ने अपनी प्रेम कहानी बताई। डोंबिवली स्टेशन पर मुलाकात, फेसबुक मैसेज और तुरंत शादी के प्रस्ताव के बाद बना खुशहाल परिवार। उन्होंने अपनी पत्नी की सालगिरह पर प्रशंसा की।

Web Title : From Dombivli station meet to marriage proposal in 15 days!

Web Summary : Amit Bhanushali, Arjun from 'Tharala Tar Mag,' shared his unique love story. Meeting at Dombivli station, a Facebook message, and a quick marriage proposal led to a happy family. He praised his wife on their anniversary.