जुई गडकरीने गायलं लता मंगेशकर यांचं गाणं, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले- "तुमचा आवाज..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 09:52 AM2024-05-23T09:52:02+5:302024-05-23T09:54:17+5:30

"भय इथले संपत नाही", 'ठरलं तर मग' फेम जुईने गायलं लता मंगेशकर यांचं गाणं

tharal tar mag fame actress jui gadkari sing lata mangeshkar bhay ithale sampat nahi song video | जुई गडकरीने गायलं लता मंगेशकर यांचं गाणं, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले- "तुमचा आवाज..."

जुई गडकरीने गायलं लता मंगेशकर यांचं गाणं, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले- "तुमचा आवाज..."

मराठी मालिकाविश्वाचा लाडका चेहरा म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी. 'पुढचं पाऊल' मालिकेत सोज्वळ आणि साध्या सुनेची भूमिका साकारून जुई घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये ती दिसली. जुई सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. 

सोशल मीडियावरुन जुई करिअर आणि वैयक्तिक जीवनातील अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अनेकदा ती रील आणि सेटवरील व्हिडिओही शेअर करत तिथली मजा मस्ती दाखवत असते. उत्तम अभिनय आणि सुंदर दिसणाऱ्या जुईचा गळाही तितकाच गोड आहे. जुईने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं भय इथले संपत नाही हे गाणं गाताना दिसत आहे. जुईचं हे गाणं ऐकून चाहतेही थक्क झाले आहेत. 

तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. "मॅडम तुमचा आवज खूप छान आहे. कवी ग्रेस यांची कविता , हृदयनाथ मंगेशकर यांचे लाभलेले संगीत आणि लता दीदींचा लाभलेला आवाज" अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. "इतके सुरेल स्वर कानावर पडल्यावर भय कोणाला वाटेल?" असंही एकाने म्हटलं आहे. तर अनेकांनी "सुंदर", "गोड आवाज", "खूपच सुंदर आवाज", "खूप छान" असं म्हणत कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

पुढचं पाऊल नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'वर्तुळ', 'सरस्वती' या मालिकांमध्ये ती झळकली. 'बिग बॉस मराठी'मध्येही जुई सहभागी झाली होती. आता सध्या ती स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती साकारत असलेली सायलीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 
 

Web Title: tharal tar mag fame actress jui gadkari sing lata mangeshkar bhay ithale sampat nahi song video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.