ग्लॅमरस दिसणाऱ्या श्वेता तिवारीचा No makeup लूक व्हायरल; फोटो पाहून नेटकरीही झाले अचंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 17:13 IST2022-03-17T17:12:48+5:302022-03-17T17:13:13+5:30
Shweta tiwari: श्वेताने तिचा सेल्फी फोटो काढला आहे. या फोटोमध्ये तिने जराही मेकअप केला नसून ती घरातील साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे.

ग्लॅमरस दिसणाऱ्या श्वेता तिवारीचा No makeup लूक व्हायरल; फोटो पाहून नेटकरीही झाले अचंबित
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी सौंदर्याच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींवर मात देते. वयाची ४० पार केल्यानंतरही श्वेताचं सौंदर्य अबाधित आहे. त्यामुळे तिच्या बोल्डनेसची आणि ग्लॅमरस लूकची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत असते. विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर श्वेताचा नो मेकअप लूक व्हायरल होत आहे. तिचा हा फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
कलाविश्वाप्रमाणेच श्वेता सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने चक्क कोणताही मेकअप न करता फोटो पोस्ट केला आहे. परंतु, तिच्या या फोटोलादेखील नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळत आहे.
श्वेताने तिचा सेल्फी फोटो काढला आहे. या फोटोमध्ये तिने जराही मेकअप केला नसून ती घरातील साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे श्वेता कोणताही मेकअप न करतादेखील तितकीच सुंदर दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, 'तुम्हीही अनिल कपूरसारख्याच एव्हरग्रीन आहात', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'नेहमीप्रमाणे सुंदर', 'हळूहळू तुमचं वय कमी होतंय', अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. श्वेता उत्तम अभिनयासोबतच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. अनेकदा ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तरं देऊन चर्चेत येत असते. श्वेताप्रमाणेच तिच्या लेकीने पलक तिवारीनेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे. त्यामुळे सध्या या मायलेकींची जोडी चर्चेत आहे.