ब्रेस्ट कॅन्सरचं निदान अन् हिना खानच्या हातून निसटले मोठे प्रोजेक्ट्स, म्हणाली- "वाईट वाटतंय पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:13 IST2025-01-24T15:10:45+5:302025-01-24T15:13:17+5:30
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान ( Hina Khan) मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

ब्रेस्ट कॅन्सरचं निदान अन् हिना खानच्या हातून निसटले मोठे प्रोजेक्ट्स, म्हणाली- "वाईट वाटतंय पण..."
Hina Khan: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान ( Hina Khan) मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हिना खान सध्या कर्करोगासारख्या गंभीर आजारासोबत लढा देत आहे. तिला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं. अशा परिस्थितीतही अभिनेत्री खचून गेलेली नाही तर प्रत्येक गोष्टीचा ती मोठ्या धीराने सामना करतेय. हिना सातत्याने उपचार घेत आहे. शिवाय आपल्या प्रकृतीबद्दल ती चाहत्यांना अपडेट सुद्धा देते. त्याचबरोबर तिने छोट्या पडद्यावर कमबॅक देखील केलं आहे. परंतु या आजारपणामुळे आपल्या हातून बऱ्याच प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी हुकली असा खुलासा तिने केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री हिना खानने तिच्या आजापणाचा कामावर कसा परिणाम झाला याबद्दल सांगितलं.नुकतीच हिना खानने इंडियन एक्सप्रेसच्या 'स्क्रीन लाइव्ह' या इव्हेंटला हजेरी लावली. त्यादरम्यान ती म्हणाली, "काही प्रोजेक्ट होते, जे सुरु होणारच होते पण मी ते प्रोजेक्ट्स केलेच नाहीत. कॅन्सरसारखा आजार असलेला माणूस २-३ महिन्यात लगेच बरा होऊ शकत नाही. यासाठी किमान एक ते दोन वर्ष लागतात. त्यामुळे बऱ्याच प्रोजेक्ट्समधून मला रिप्लेस करण्यात आलं. हा निर्णय घेणं त्यांच्यासाठी सुद्धा कठीण होतं. पण, हेच योग्य होतं."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "मला दोन प्रोजेक्ट्स सोडावे लागले. कारण, त्यावेळी माझं आरोग्य हेच माझ्यासाठी पहिलं प्राधान्य होतं. या आजारपणामुळे मला सुरुवातीला खूप त्रास सहन करावा लागला, परंतु आता सवय झाली आहे. पहिल्यांदा मला वाईट वाटलं, पण त्यानंतर आता मी पुन्हा कामावर परतली आहे."
नुकतीच हिना खानची 'गृहलक्ष्मी' ही वेब सीरिज रिलीज करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता चंकी पांडेसोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे. लवकरच 'कंट्री ऑफ ब्लाइंड' हा सिनेमा भारतात रिलीज होईल.