पुत्र जन्मला! 'TV'चा स्टार अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 11:48 IST2026-03-30T11:46:18+5:302026-03-30T11:48:32+5:30
'बिग बॉस १८' फेम अभिनेत्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, आनंद व्यक्त करत म्हणाला...

पुत्र जन्मला! 'TV'चा स्टार अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी
Vivian Dsena: ‘मधुबाला’,‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता विवियन डिसेना हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय असणारं नाव आहे. विवियन डिसेना सध्या त्याच्या व्यावसायिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस १८’ पर्व गाजवणारा हा टीव्ही स्टार नुकताच बाबा झाला आहे. विवियनच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय.
विवियन आणि त्याची पत्नी नूरान यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केलं आहे. त्यांच्या घरी गोंडस मुलाचं आगमन झालंय. आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या पोस्टद्वारे आनंदभावना व्यक्त करत विवियननं लिहिलंय," मी काही काळ लोकांच्या नजरेपासून दूर राहिलो. पण त्यामागे कारणही होते. काही गोष्टी आधी जगल्या जातात, नंतर सांगितल्या जातात. माझ्या मौनाने खूप काही सांगितलं. माझं कुटुंब आणखी मोठे झाले आहे. आणि या वेळी आमच्या घरी राजकुमाराचा जन्म झाला आहे." अशी सुंदर पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे.विवियन-नूरान या जोडप्याने ही गोड बातमी शेअर करताच, कला विश्वातील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, नूरान ही विवियनची दुसरी पत्नी आहे. नूरन अली एक पत्रकार आहे. तिला भारत देश खूप आवडतो. लग्नानंतर नूरनने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच ती पती विवियनसोबत मुंबईत शिफ्ट झाली. विवियन त्याची पहिली बायको अभिनेत्री वाहबीज दोराबजीबरोबर घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात असताना नूरनची विवियनशी भेट झाली होती. विवियन आणि नूरान यांना आधीच एक मुलगी आहे, जिचा जन्म २०२२ मध्ये झाला होता.