लग्नानंतर तेजस्विनी लोणारी पती समाधान यांच्यासह लंडनला गेली हनिमूनला, शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 16:27 IST2025-12-08T16:26:39+5:302025-12-08T16:27:43+5:30
तेजस्विनी आणि समाधान यांनी लग्नानंतर लंडन गाठलं आहे. लंडनमध्ये ते त्यांचा क्वालिटी टाइम एकत्र घालवत आहेत.

लग्नानंतर तेजस्विनी लोणारी पती समाधान यांच्यासह लंडनला गेली हनिमूनला, शेअर केला व्हिडीओ
बिग बॉस मराठी फेम तेजस्विनी लोणारी नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. समाधान सरवणकर यांच्याशी लग्न करत तेजस्विनी सरवणकर घराण्याची सून झाली आहे. तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांनी दत्तजयंतीच्या मुहुर्तावर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. लग्नानंतर तेजस्विनी आणि समाधान हनिमूनसाठी परदेशी गेले आहेत.
तेजस्विनी आणि समाधान यांनी लग्नानंतर लंडन गाठलं आहे. लंडनमध्ये ते त्यांचा क्वालिटी टाइम एकत्र घालवत आहेत. लंडनमधील काही फोटो आणि व्हिडीओ तेजस्वी आणि समाधान यांनी शेअर केले आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीमधूनही तेजस्विनीने लंडनमधील निसर्गरम्य दृश्यांची आणि पर्यटन स्थळांची झलक दाखवली आहे.
तेजस्विनी लोणारी हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. काही मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. बिग बॉस मराठीमुळे तेजस्विनी प्रसिद्धीझोतात आली होती. तर समाधान सरवणकर हे राजकारणात सक्रिय आहेत. शिवसेना नेते सदानंद सरवणकर यांचे ते पुत्र आहेत. समाधान सरवणकर हे शिंदे गटाचे युवानेते आहेत.