मराठमोळी तेजस्वी ९ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ, आईनेही दिली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:28 IST2025-03-19T12:28:01+5:302025-03-19T12:28:24+5:30
मराठमोळी तेजस्वी ९ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी लग्नगाठ बांधणार आहे. याबाबत तिच्या आईनेच खुलासा केलाय.

मराठमोळी तेजस्वी ९ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी बांधणार लग्नगाठ, आईनेही दिली परवानगी
Tejasswi Prakash: अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून तेजस्वी ही अभिनेता करण कुंद्राला करतेय डेट करतेय. टीव्हीवरील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी ते एक आहेत. चाहते या जोडीवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे दोघं लग्न कधी करणार, असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येतो. तेजस्वीचं लग्न कधी होणार, याबाबत आता तिच्या आईनेच खुलासा केला.
नुकतंच 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या एपिसोडमध्ये फराह खानने तेजस्वीच्या आईला लेकीच्या लग्नाबद्दल विचारला होता. या प्रश्नावर तेजस्वीच्या आईने उत्तर दिलं. त्या म्हणाल्या,"लग्न याच वर्षी होणार आहे". अर्थात तेजस्वी आणि करण कुंद्रा यांच्या नात्याला अभिनेत्रीच्या आईकडून मंजुरी मिळाल्याचं स्पष्ट झालंय. आईच्या खुलाशानंतर सर्वांनी तेजस्वीला शुभेच्छा दिल्या.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश याचवर्षात लग्नगाठ बांधतील असं बोललं जात आहे. करण कुंद्रा तेजस्वीहून ८ वर्षांनी मोठा आहे. करण ३७ वर्षांचा असून तेजस्वी २९ वर्षांची आहे. दोघांची भेट 'बिग बॉस १५'च्या (Bigg Boss 15) घरात झाली होती. येथेच या दोघांची मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. तेव्हापासून दोघेही एकत्र आहेत. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अनेकदा ते सोशल मीडियावर ट्रेंड करत असतात. त्यांच्या नावाचे वेगवेगळे हॅशटॅगही चर्चेत आहेत. यापैकी #TejRan अनेकदा वापरलेला दिसतो.