Tehseen Poonawalla: बिग बॉस फेम तहसीन पूनावाला झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 19:04 IST2023-03-01T19:02:39+5:302023-03-01T19:04:50+5:30
टीव्ही अभिनेता आणि 'बिग बॉस'चा एक्स कंटेस्टेंट तहसीन पूनावाला बाबा झाला आहे.

Tehseen Poonawalla: बिग बॉस फेम तहसीन पूनावाला झाला बाबा, पत्नीने दिला गोंडस बाळाला जन्म
टीव्ही अभिनेता आणि 'बिग बॉस'चा एक्स कंटेस्टेंट तहसीन पूनावाला बाबा झाला आहे.1 मार्च रोजी आज सकाळी त्याची पत्नी मोनिकाने पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून त्याने त्याच्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. फॅन्स आई-वडील झाल्याबद्दल या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.
तहसीनने इंस्टाग्रामवर पोस्ट करत पत्नी आणि मुलांचे खास फोटो शेअर केले आहेत. मोनिकाने आणि बाळाचे हे फोटो हॉस्पिटलमधले फोटो आहेत. मात्र, अभिनेत्याने बाळाचा चेहरा दाखवला नाही. एका फोटोत तो आपल्या बाळाला धरून बसलेला दिसत आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्याने वडील झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्याने आपल्या मुलाचे नावही सांगितले. त्याने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आम्हाला आमच्या मुलाच्या आगमनाची घोषणा करताना आनंद होत आहे. तहसीनने जुर्वानचा अर्थ समजावून सांगितला, 'जो वेळ आणि भाग्यावर नियंत्रण ठेवतो.' या पोस्टद्वारे त्यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभारही मानले आहेत.
तहसीन आणि मोनिकाचे 2016 मध्ये लग्न झाले होते. मोनिका ही प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची चुलत बहीण आहे. गेल्या वर्षी या जोडप्याने प्रेग्नेंसी फोटोशूट केले होते.