'तारक मेहता..'मधील 'गोली' भारत सोडून गेला परदेशात, कारण सांगत म्हणाला, "मी एकटा.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:33 IST2025-06-25T12:33:03+5:302025-06-25T12:33:29+5:30

तारक मेहता का उलटा चष्मामधील गोली भारत सोडून अमेरिकेत स्थायिक झाला आहे, काय आहे यामागचं कारण?

Tarak Mehta ka ooltah chashmah fame goli kush shah shift india to new york america | 'तारक मेहता..'मधील 'गोली' भारत सोडून गेला परदेशात, कारण सांगत म्हणाला, "मी एकटा.."

'तारक मेहता..'मधील 'गोली' भारत सोडून गेला परदेशात, कारण सांगत म्हणाला, "मी एकटा.."

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ही मालिका प्रेक्षकांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरली. गेली १५ हून जास्त वर्ष ही मालिका टीव्हीवर टीआरपीमध्ये अव्वल आहे. या मालिकेतील एका अभिनेत्याने देश सोडला आहे. हा अभिनेता म्हणजे मालिकेत ‘गोली’ म्हणजेच गुलाबकुमार हাथीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाह. कुश आता अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाला आहेत. कुशने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन ही माहिती सर्वांसोबत शेअर केली आहे. 

म्हणून कुश अमेरिकेत शिफ्ट झाला

कुश शाह पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्कला शिफ्ट झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने याविषयी मौन सोडलं आहे. कुशने सांगितलं की, "मी सध्या न्यूयॉर्कला असून एकटा राहतोय. कारण जो व्यक्ती माझ्यासोबत रुम शेअर करणार होता तो आलाच नाही. त्यामुळे मला एकट्यालाच ही सर्व जागा मिळाली आहे. मी न्यूयॉर्कमध्ये एकटा राहतोय. माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे कारण बिछान्यात जेवताना झुरळं येतात. असं काही अनुभवणं हे माझ्यासाठी नवीन आहे."


"मी तीन महिन्यात अनेक गोष्टी शिकल्या. कारण मला आजवर सर्व आयतं हातात मिळालं आहे. मी अनेक वर्ष लक्झरी आयुष्य जगत आई-बाबांसोबत राहत होतो. परंतु न्यूयॉर्कमध्ये सर्व गोष्टी स्वतःच कराव्या लागत आहेत. तेव्हा मला लक्षात आलं की, गडबड होतेय. मी झोपायच्या आधी भांडी घासायचो नाही. तेव्हा मला कळालं की, साध्या गोष्टीही किती कठीण असतात. मला स्वतःवर खूप राग येतोय. मी न्यूयॉर्कला सुरुवातीला गोंधळलो होतो. परंतु खरं सांगायचं तर, टाइम स्क्वेवरपेक्षा घाटकोपर मला जास्त आवडतं."

Web Title: Tarak Mehta ka ooltah chashmah fame goli kush shah shift india to new york america