धक्कादायक! भांडण टोकाला जाऊन 'जेठालाल'वर फेकण्यात आलेली खुर्ची, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:16 IST2024-05-21T13:13:33+5:302024-05-21T13:16:43+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या सेटवर जेठालाल अर्थात दिलीप जोशींवर खुर्ची फेकण्यात आली होती. काय होतं ते भांडण आणि कोणी केली ही कृती?

धक्कादायक! भांडण टोकाला जाऊन 'जेठालाल'वर फेकण्यात आलेली खुर्ची, नेमकं काय घडलं?
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. 'तारक मेहता...' मधील जेठालाल आणि दयाभाभी यांची जोडी प्रेक्षकांच्या खास पसंतीची. पण गेल्या अनेक वर्षांपासून हा शो विविध वादांमध्ये सापडला आहे. जेनिफर मिस्त्रीने निर्माते असित मोदी यांच्यावर केलेले अत्याचाराचे आरोप, शैलेश लोढा यांनी मतभेदांमध्ये सोडलेला शो अशा अनेक कारणांमुळे 'तारक मेहता...' शो चांगलाच चर्चेत आहे. अशातच रोशन भाभींची भूमिका साकारणारी जेनिफरने जेठालाल अर्थात दिलीप जोशींबद्दलचा धक्कादायक किस्सा सांगितला आहे.
बॉलिवूड ठिकाना या चॅनलशी बोलताना जेनिफरने सांगितले की, एकदा दिलीपचे सोहेल रहमानीसोबत भांडण झाले होते. सोहिल दुसरा कोणी नसून शोचा ऑपरेशनल हेड होता. जेनिफरने सांगितले की, एकदा दिलीप आणि सोहिल यांच्यात काही मुद्द्यावरून जोरदार भांडण झाले. त्यामुळे सोहिलने दिलीप यांच्यावर खुर्ची फेकून दिली. ही घटना घडल्यावर दिलीप यांनी धमकी दिली की, सोहिल शोमध्ये राहिला तर ते 'तारक मेहता..' मालिका सोडतील.
Which one your favorite Episode of Taarak Mehta Ka Ooltah Chasmah.
— Reetesh Pal (@PalsSkit) March 10, 2024
My:- "Jethalal Electric shock"#tmkoc#jethalal#tarakmehtakaultachashmapic.twitter.com/JowAXgyiat
अभिनेत्रीने पुढे सांगितले की, हे भांडण संपवण्यासाठी सोहिलला दिलीपपासून दूर ठेवण्यात आले. तब्बल 2 वर्ष हे चालू होते. इतकंच नाही तर बाकीच्या कलाकारांनीही सोहिलच्या गैरवर्तनामुळे त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. अशाप्रकारे रोशन भाभी अर्थात जेनिफर यांनी खुलासा केला. दरम्यान जेनिफर यांनी निर्माते असित मोदींवर जो खटला दाखल केलेला त्यासाठी कोर्टाने असित मोदींना नुकसानभरपाईची शिक्षा सुनावली.