आईसमोरच पापाराझींनी 'जेठालाल'बद्दल विचारताच 'बबिता' फेम मुनमुनने मारला डोक्यावर हात, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 14:09 IST2024-08-21T14:08:56+5:302024-08-21T14:09:25+5:30

तारक मेहता... मध्ये बबिताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला आईसमोरच मीडियाने असा प्रश्न विचारला की सर्वांमध्ये हशा पिकला (munmun dutta)

tarak mehta fame Babita Munmun dutta was teased by paparazzi about Jethalal in front of her mother video viral | आईसमोरच पापाराझींनी 'जेठालाल'बद्दल विचारताच 'बबिता' फेम मुनमुनने मारला डोक्यावर हात, म्हणाली...

आईसमोरच पापाराझींनी 'जेठालाल'बद्दल विचारताच 'बबिता' फेम मुनमुनने मारला डोक्यावर हात, म्हणाली...

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिका सर्वांच्या आवडीची आहे.  या मालिकेतील जेठालाल आणि बबिता या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय. मालिकेत या दोघांचं जे खास नातं आहे त्यामुळे रिअल लाईफमध्येही जेठालाल आणि बबिताची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळतं. इतकंच नव्हे जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी आणि बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता या दोघांना मीडिया चिडवताना दिसते. असाच एक प्रसंग नुकताच घडला. जेव्हा बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आईसोबत एके ठिकाणी असताना मीडियाने तिला जेठालालबद्दल विचारलं. तेव्हा मुनमुन काय म्हणाली बघा.

मीडियाने मुनमुनला चिडवलं, अभिनेत्री म्हणाली...

मुनमुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत मुनमुन तिच्या आईसोबत होती. मुनमुनला पाहताच पापाराझी तिचे फोटो काढण्यासाठी पुढे आले. मुनमुन आईसमोर फोटोला पोज देण्यासाठी उभी राहिली. तेव्हा एकाने मुनमुनला चिडवलं की, "तुमच्या वाढदिवसाला जेठालालला नक्की बोलवा." हे ऐकताच मुनमुनचा मूड ऑफ झाला. तिची आई मात्र हसायला लागली. पुढेही मुनमुनही काहीशी हसतच म्हणाली, "अरे भाई, कधीतरी हा विषय सोडा. शो वेगळा आहे. खरं आयुष्य वेगळं आहे." असं म्हणत मुनमुनने पुढे आईसोबत फोटो काढले. 


मुनमुन दत्ता बिग बॉस १८ मध्ये जाणार?

सलमान खानच्या आगामी बिग बॉस १८ ची सध्या चर्चा आहे. या आगामी पर्वात कोणते स्पर्धक सहभागी असणार याची चर्चा होती. अशातच काही दिवसांपूर्वी या शोमध्ये मुनमुन दत्ता सहभागी होणार असं सांगितलं जात होतं. परंतु मुनमुन दत्ताने मात्र बिग बॉसच्या १८ व्या पर्वाची ऑफर नाकारली असल्याचं समजतंय. गेली १० हून अधिक वर्ष मुनमुन तारक मेहता... मध्ये बबिताची भूमिका आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भूमिका सर्वांमध्ये लोकप्रिय आहे.

Web Title: tarak mehta fame Babita Munmun dutta was teased by paparazzi about Jethalal in front of her mother video viral