'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत ८ वर्षांनी कमबॅक करणार 'हा' कलाकार? चाहत्यांना उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 10:27 IST2025-11-10T10:24:45+5:302025-11-10T10:27:11+5:30
'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत ८ वर्षांनी एक सुप्रसिद्ध अभिनेता कमबॅक करणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर स्वतः अभिनेत्याने या चर्चांवर मौन सोडलंय

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत ८ वर्षांनी कमबॅक करणार 'हा' कलाकार? चाहत्यांना उत्सुकता
गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उलटा चष्मा'. या मालिकेतील पात्रे नेहमीच चर्चेत असतात. या मालिकेतील सर्वात महत्त्वाच्या पात्रांपैकी एक म्हणजे टप्पू. 'टप्पू'ची भूमिका साकारणारा मूळ अभिनेता भव्य गांधी हा मालिकेत परतणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अखेर या चर्चांवर भव्य गांधीने मौन सोडलंय.
टप्पूच्या पुनरागमनाची चर्चा का?
भव्य गांधीने अनेक वर्षे टप्पूची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. २०१७ मध्ये भव्यने ही मालिका सोडल्यानंतर, चाहते अजूनही त्याला 'ओरिजिनल टप्पू' म्हणून ओळखतात. सध्या टप्पूचे पात्र अभिनेता नितीश भालुनी साकारत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये भव्य गांधीला या चर्चांबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा भव्यने हे स्पष्ट केलं की, सध्या त्याचा 'तारक मेहता'मध्ये परत येण्याचा कोणताही विचार नाहीये. त्याने सांगितले की, तो सध्या इतर प्रोजेक्ट्समध्ये आणि गुजराती चित्रपटसृष्टीमध्ये खूप व्यस्त आहे.
भव्यने तारक मेहता... मालिकेबद्दल प्रेम व्यक्त केले, पण त्याचसोबत त्याने सांगितलं की, तो कमबॅक करणार या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नाही. त्याला 'तारक मेहता'च्या टीमसोबत काम करून आनंद झाला, पण आता तो आपल्या करिअरमध्ये पुढे जात आहे. त्यामुळे, टप्पूच्या भूमिकेत भव्य गांधीला परत पाहण्याची इच्छा बाळगणाऱ्या चाहत्यांची सध्या तरी निराशा होणार आहे. गेली अनेक वर्ष कोणताही खंड न पडता 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.