Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:32 IST2025-09-19T13:30:59+5:302025-09-19T13:32:50+5:30
Tanya Mittal : तान्या मित्तलने आपलं लग्न आणि पार्टनरबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो "बिग बॉस १९" मध्ये दिसलेली तान्या मित्तल नेहमीच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. ती सतत तिच्या कुटुंबाबद्दल, व्यवसायाबद्दल, पैशांबद्दल सांगून मोठेपणा करत असल्याने बिग बॉसमधील सदस्य आणि सोशल मीडिया युजर्स तिची खिल्ली उडवत आहेत. याच दरम्यान तान्या मित्तलचा एक जुना इंटरव्ह्यू खूप व्हायरल होत आहे.
Newscoop ला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तान्याने आपलं लग्न आणि पार्टनरबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत. "मला माहित नाही की, या जगात मला आवडेल असा कोणी आहे की नाही. माझी बेरोजगार तरुणाशी लग्न करण्यासही काही हरकत नाही. सार्वजनिक ठिकाणी त्याच्या पाया पडायला किंवा त्याचे पाय दाबायलाही माझी काही हरकत नाही. मला असं वाटतं की, कोणत्याही नात्यात मोठं किंवा लहान असं काही नसतं" असं तान्याने म्हटलं आहे.
एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा
"जेवल्यावर एक्स बॉयफ्रेंडचे टॉवेलने पुसायची हात"
तान्याने सांगितलं की, ती तिच्या प्रेमासाठी काहीही करण्यास तयार असते. तिने तिच्या आधीच्या रिलेशनशिपमधील आठवणी सांगितल्या. ती तिच्या पार्टनरला स्पेशल फील करण्याची एकही संधी कधीच सोडत नव्हती. ती जेवण झाल्यावर तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे हात टॉवेलने पुसायची. ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतही असेच करेल. तान्या म्हणाली की, नवऱ्याला राजासारखं ठेवेन.
५०० साड्या, ५० किलो दागिने आणि चांदीची भांडी घेऊन बिग बॉसच्या घरात पोहोचली 'ती'
१२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
"मी खूप रोमँटिक होते"
"मी जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा मी खूप रोमँटिक होते. माझ्या बॉयफ्रेंडचं जेवण झाल्यावर मी त्याचे हात पुसण्यासाठी टॉवेल घेऊन जायचे. मला माहित आहे की मी माझ्या पतीसोबतही असेच करेन. मला वाटतं की माझ्या पतीला नेहमीच राजासारखं असल्यासारखं वाटावं" असंही तान्याने म्हटलं आहे. तान्या मित्तल केवळ 'बिग बॉस'च्या घरातच नाही तर घराबाहेरही चर्चेत आहे. यामागील कारण म्हणजे ती असं काही बोलते की आपसूकच लोकांचं लक्ष तिच्याकडे वळतं.