"अजय देवगण, काजोल स्टार्स; पण मला ते यश..." काजोलची बहीण तनिषा मुखर्जीची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 09:16 IST2023-11-07T09:14:50+5:302023-11-07T09:16:02+5:30

नुकत्याच सुरु झालेल्या 'झलक दिखला जा 11' चा एक प्रोमो सध्या व्हायरल होतोय.

Tanisha Mukherjee accepts sister kajol and ajay devgn are stars she coulnt find success | "अजय देवगण, काजोल स्टार्स; पण मला ते यश..." काजोलची बहीण तनिषा मुखर्जीची खंत

"अजय देवगण, काजोल स्टार्स; पण मला ते यश..." काजोलची बहीण तनिषा मुखर्जीची खंत

अभिनेत्री काजोलची (Kajol) भारतीय सिनेसृष्टीत वेगळी ओळख आहे. तिने तिच्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसंच तिचा नवरा अजय देवगणही (Ajay Devgn) बॉलिवूडमध्ये स्टार आहे. काजोलची आई तनुजा देखील एकेकाळच्या यशस्वी अभिनेत्री. या स्टार कुटुंबातीलच एक सदस्य काजोलची बहीण तनिषा मुखर्जी (Tanisha Mukherjee) मात्र ते यश मिळवू शकली नाही. नुकतंच 'झलक दिखला जा 11' या डान्स रिएलिटी शोमध्ये तिने याबद्दल खुलासा केला. 

नुकत्याच सुरु झालेल्या 'झलक दिखला जा 11' चा एक प्रोमो सध्या व्हायरल होतोय. यामध्ये तनिषा मुखर्जी स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. 'लैला मै लैला' गाण्यावर ती डान्स करते. तिचा परफॉर्मन्स पाहून परिक्षक मलायका अरोरा, फराह खान, अर्शद वारसी प्रभावित होतात. फराह आणि मलायका तिचं कौतुक करतात. फराह खान म्हणते,'आज रात्रीची तू स्टार आहेस'. तेव्हा तनिषा म्हणते,'माझ्या कुटुंबात अजय देवगण, काजोल हे सर्व स्टार्स आहेत. मी त्या स्टेजपर्यत नाही पोहोचू शकले. मी काही स्टार नाही.'

तनिषा मुखर्जीने २० वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. नील और निकी, टँगो चार्ली सारख्या सिनेमांमध्ये ती दिसली. मात्र आई आणि बहिणीसारखं यश तिला मिळालं नाही. तनिषाने नंतर बिग बॉसमध्येही प्रवेश घेतला. तिथे तिचं आणि अरमान कोहलीचं अफेअर  चर्चेत होतं. सध्या तनिषा झलक दिखला जा शोचा भाग आहे . 

Web Title: Tanisha Mukherjee accepts sister kajol and ajay devgn are stars she coulnt find success