Taarak Mehta फेम बबिताचा जर्मनीमध्ये झाला अपघात, अभिनेत्री पोस्ट शेअर म्हणाली..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 16:27 IST2022-11-21T16:14:36+5:302022-11-21T16:27:17+5:30
Munmun Dutta Accident:मुनमुन दत्ता युरोप टूरवर असताना तिचा अपघात झालाय. अभिनेत्रीने चाहत्यांसाठी एक पोस्ट शेअर करत तिच्या तब्येतीची माहिती दिली आहे.

Taarak Mehta फेम बबिताचा जर्मनीमध्ये झाला अपघात, अभिनेत्री पोस्ट शेअर म्हणाली..
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actress Accident: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बबिता जीची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta ) तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मुनमुन दत्त सध्या जर्मनीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करायला गेली मात्र या दरम्यान तिचा अपघात झाला. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या दुर्घटनची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे.
मुनमुन दत्ताने २१ नोव्हेंबरला तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरीशेअर करत अपघाताबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्रीने लिहिले, 'जर्मनीमध्ये एक छोटासा अपघात झाला आहे. माझ्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. यामुळे मला माझा ट्रिप शॉर्ट करत घरी परतावं लागलं. मुनमुनने पोस्टच्या शेवटी तुटलेल्या हार्टचा इमोजीही टाकला आहे. अपघातामुळे त्याला तिची युरोप ट्रीप लवकर संपवावी लागली. मुनमुनचे चाहते तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
स्वित्झर्लंडमध्ये एन्जॉय करत होती
मुनमुन जर्मनीच्या आधी स्वित्झर्लंडमध्ये फिरत होती. तिला जर्मनीला येऊन देखीन दोन दिवस झाले होतं. मुनमुन दत्तानं स्वित्झर्लंडमध्ये एन्जॉय केलं होतं. तिथलं फोटोही हि तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता खूप खुश दिसत होती. पण दुर्दैवाने तिचा अपघात झाला आणि त्यामुळे तिला प्रवास अर्धवट सोडून घरी परतावे लागले. मुनमुन दत्ता कामातून ब्रेक घेऊन युरोपच्या दौऱ्यावर गेली.