‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या बबीताने सुरू केला नवा बिझनेस, अॅक्टिंगला करणार का बायबाय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 17:21 IST2022-02-22T17:21:05+5:302022-02-22T17:21:31+5:30
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अनेक सेलिब्रिटी अॅक्टिंग करतात, जोडीला साईड बिझनेस करतात. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबीताजी अर्थात मुनमुन दत्ता हिचं नावही या यादीत सामील झालं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या बबीताने सुरू केला नवा बिझनेस, अॅक्टिंगला करणार का बायबाय?
एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतले अनेक सेलिब्रिटी अॅक्टिंग करतात, जोडीला साईड बिझनेस करतात. आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील बबीताजी अर्थात मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिचं नावही या यादीत सामील झालं आहे. होय, मुनमुनने नवं रेस्टॉरंट सुरू केलंय.
नुकताच एक व्हिडीओ शेअर करत तिने आपल्या या नवीन रेस्टॉरंटची माहिती दिली. मानलेला भाऊ व मॅनेजर क्यूर सेठ यांच्यासोबत मिळून तिने हे नवीन रेस्टॉरंट सुरु केलं आहे. ‘फेब 87 ’ असं नाव असलेलं हे रेस्टॉरंट एक जॉइंट वेंचर असेल. या रेस्टॉरंटमध्ये गुजराती स्पेशल, चायनीज, कॉन्टिनेंटल आणि अशा अनेक खाद्यपदार्थांची चव मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे.
कोट्यावधीची मालकीण आहे मुनमुन
मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मुळे घराघरात पोहोचली. सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे. कमाईच्या बाबतीतही ती कमी नाही. रिपोर्टनुसार, एका एपिसोडसाठी ती 35 ते 40 हजार फी घेते. तिची नेटवर्थ 4 मिलियन डॉलर म्हणजे 29.36 कोटी रूपये आहे. मुनमुनने वयाच्या सहाव्या वर्षी एक रोल केला होता. त्यासाठी तिला 125 रूपये मानधन मिळालं होतं. ती तिची पहिली कमाई होती. आज ती कोट्यावधीची मालकीण आहे. इनोव्हा क्रिस्टा व स्विफ्ट डिजायर या अलिशान गाड्या आहेत. आता ती रेस्टॉरंटची मालकीणही झाली आहे. अर्थात अॅक्टिंग सोडण्याचा तूर्तास तरी तिचा काहीही इरादा नाहीये.
यामुळे होती चर्चेत
काही काळापूर्वी मुनमुन दत्ता आणि राज अनादकत यांच्या अफेअरच्या बातम्यांनीही खूप चर्चेला उधाण आलं होतं. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये राज ‘टप्पू’ची भूमिका साकारत आहे. या दोघांच्या अफेअरच्या बातम्यांवरून मुनमुनला खूप ट्रोल करण्यात आलं होतं आणि अभिनेत्रीला ही गोष्ट आवडली नाही .मुनमुनने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ट्रोल करणाºयांना चांगलंच सुनावलं होतं आणि राजसोबतच्या तिच्या अफेअरची बातमी खोटी असल्याचे सांगितलं होतं.