'तारक मेहता'मधील 'बबीता जी'च्या अडचणीत वाढ, अटक होण्याची शक्यता! नेमकं काय घडलं वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 15:35 IST2022-01-30T15:23:54+5:302022-01-30T15:35:03+5:30
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टेलिव्हिजनवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील 'बबीता जी' म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

'तारक मेहता'मधील 'बबीता जी'च्या अडचणीत वाढ, अटक होण्याची शक्यता! नेमकं काय घडलं वाचा...
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टेलिव्हिजनवरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील 'बबीता जी' म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मुनमुनला लवकरच अटक केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मुनमुन तिच्या एका वादग्रस्त व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. या व्हिडिओ जातीवाचक टिप्पणी केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परिस्थिती चिघळत असल्याचं दिसून आल्यानंतर मुनमुन हिनं घडलेल्या प्रकाराबाबत सर्वांची माफी देखील मागितली. तिनं एक अधिकृत पत्रक जारी करुन आपण व्हिडिओ उल्लेख केलेल्या शब्दाचा खरा अर्थ माहित नव्हता असं स्पष्टीकरण दिलं आहे. पण माफीनामा सादर केल्यानंतरही हिसारच्या विशेष न्यायालयानं मुनमुन दत्ताचा जामीन अर्ज फेटाळू लावला आहे. त्यामुळे मुनमुन दत्ताच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुनमुन दत्ताचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनलवर ती व्हिडिओच्या माध्यमातून विविध विषयांवर बोलत असते. मुनमुन दत्ता हिनं गेल्या वर्षी तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात काही वादग्रस्त वक्तव्य केली गेली होती. मुनमुन हिनं जाणूनबुजून अनुसूचित जाती समाजाला लक्ष्य केल्याचं बोललं गेलं. त्यानंतर मुनमुन दत्ता ट्विटरवर ट्रोल होण्यास सुरुवात झाली होती. #ArrestMunmunDutta असा हॅशटॅगच नेटझिन्सनं ट्रेंड केला होता.
बिग बॉस-१५ मध्येही हजेरी
'तारक मेहता' फेम मुनमुन दत्तानं बिग बॉस-१५ मध्येही उपस्थती लावली होती. मुनमुनसोबत सुरभी चंदना, विशाल सिंह आणि आकांक्षा पुरी पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुनमुन दत्ता हि बिग बॉस शोची चाहती आहे. या शोचा एकही एपिसोड ती चुकवत नाही असं तिनं स्वत: म्हटलं होतं. या शोमध्ये एखाद्या स्पर्धकासोबत काही चुकीचं घडलं किंवा चुकीचं वागलं गेलं तर ती नेहमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याबाबत व्यक्त होत असते.