Swayamvar-Mika Di Vohti: या मराठमोळ्या कॉमेडियनची मुलगी जिंकू शकेल का मिका सिंगचं मन? स्वयंवरात झालीये सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 12:46 IST2022-06-24T12:42:16+5:302022-06-24T12:46:00+5:30

Swayamvar-Mika Di Vohti: मिकासोबत लग्नगाठ बांधण्याच्या इच्छेने एकापेक्षा एक सुंदर तरूणी ‘स्वयंवर- मिका दी वोटी’ या शोमध्ये आल्या आहेत. यापैकी एक मराठमोळ्या अभिनेत्याची मुलगी आहे. सध्या तिचीच चर्चा आहे.

swayamvar mika di vohti famous comedian VIP daughter dhwani pawar has also participated in swayamva | Swayamvar-Mika Di Vohti: या मराठमोळ्या कॉमेडियनची मुलगी जिंकू शकेल का मिका सिंगचं मन? स्वयंवरात झालीये सहभागी

Swayamvar-Mika Di Vohti: या मराठमोळ्या कॉमेडियनची मुलगी जिंकू शकेल का मिका सिंगचं मन? स्वयंवरात झालीये सहभागी

Swayamvar-Mika Di Vohti: बॉलिवूडचा लोकप्रिय सिंगर मिका सिंग (Mika Singh) सध्या त्याची आयुष्याची जोडीदार शोधण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. होय, मिकाचं स्वयंवर होतंय. स्टार भारत वाहिनीवर ‘स्वयंवर- मिका दी वोटी’ हा नवा कोरा शो  सुरू झाला आहे. या शोमध्ये 12 सुंदर तरूणी सहभागी झाल्या आहेत आणि यापैकीच एकीसोबत मिका लग्नगाठ बांधणार आहे.
मिकासोबत लग्नगाठ बांधण्याच्या इच्छेने एकापेक्षा एक सुंदर तरूणी या शोमध्ये आल्या आहेत. यापैकी एक मराठमोळ्या अभिनेत्याची मुलगी आहे. सध्या तिचीच चर्चा आहे.

ही कोण तर ध्वनी पवार (Dhwani Pawar). शोमध्ये मिकाला इम्प्रेस करण्याची एकही संधी ध्वनी सोडत नाहीये. अलीकडे ती मिकासोबत स्पीड डेटवर गेली होती. ही ध्वनी लोकप्रिय कॉमेडीयन ‘व्हीआयपी’ची मुलगी आहे. व्हीआयपी कोण तर कॉमेडियन विजय पवार. कॉमेडी सर्कस या शोमध्ये विजय पवार यांना तुम्ही पाहिलं असेलच. या शोनंतर ते व्हीआयपी म्हणून ओळखले जाऊ लागले. कॉमेडी सर्कस, देख इंडिया देख, कॉमेडी नाईट्स, कॉमेडी क्लासेस,  बाकरवडी शोमध्ये विजय पवार यांनी काम केलं आहे.  

 बोल बच्चन,सजन रे झूठ मत बोलो, हम सब उल्लू है अशा चित्रपटातून त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. विजय पवार हे 150 कलाकारांची मिमिक्री करतात.

ध्वनी ही त्यांचीच लेक आहे. व्हाईट ओव्हर आर्टिस्ट अशी तिची ओळख आहे. अनेक शो तिने होस्ट केले आहेत. तिला संगीतातही रूची आहे.  बळी  या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ध्वनीने ‘चला हवा येऊ द्या’ मंचावरही उपस्थित दर्शवली होती.

Web Title: swayamvar mika di vohti famous comedian VIP daughter dhwani pawar has also participated in swayamva