VIDEO : अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णींची भेट, सुशांतच्या आठवणीत दोघींचेही डोळे पाणावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 14:06 IST2020-12-05T14:01:53+5:302020-12-05T14:06:08+5:30
'पवित्र रिश्ता' मालिका संपल्यावर अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांच्यात तशी फारच कमी भेटी झाल्या. अंकिता आणि उषा अनेक वर्षांनी एकमेकींना भेटल्या.

VIDEO : अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णींची भेट, सुशांतच्या आठवणीत दोघींचेही डोळे पाणावले!
'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे 'झी रिश्ते अवॉर्ड्स २०२०'च्या तयारी बिझी आहे. अंकिताने सोशल मीडियावर रिहर्सलचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. अंकिता लोखंडे एका डान्सच्या माध्यमातून ट्रिब्यूट देणार आहे. याच रिहर्सल दरम्यान अंकिता सुशांतची ऑनस्क्रीन आई उषा नाडकर्णी यांना भेटायला पोहोचली होती. यावेळी दोघीही सुशांतची आठवण काढून इमोशनल झाल्याचे दिसले. या भेटीचा व्हिडीओ अंकिताने शेअर केलाय.
'पवित्र रिश्ता' मालिका संपल्यावर अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांच्यात तशी फारच कमी भेटी झाल्या. अंकिता आणि उषा अनेक वर्षांनी एकमेकींना भेटल्या. अंकिताने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'आईला बऱ्याच वर्षांनी भेटले. त्या दिवसेंदिवस तरूण होताहेत. एकदम कडक आई..'.
आपल्या ऑनस्क्रीन सासू उषा नाडकर्णी यांच्या गोष्टी ऐकून अंकिता लोखंडेचं मनही हलकं झालं. अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी काही तास एकमेकींसोबत गप्पा करत होत्या. अंकितासोबत जुन्या आठवणी ताज्या करता करता उषा नाडकर्णी यांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं.
'पवित्र रिश्ता' या मालिकेत उषा नाडकर्णी आणि सुशांत सिंह राजपूतने आई-मुलाची भूमिका साकारली होती. अशात सेटवर दोघे जास्तीत जास्त वेळ सोबत घालवत होते. दोघांमध्ये अनेक सीन्स होते. यादरम्यान दोघांचं चांगलं नातं तयार झालं होतं. सुशांत उषा नाडकर्णी यांचा फार सन्मान करायचा.