अरे बापरे! पॅडीने सर्वांसमोर आवाज चढवल्याने सूरज दुखावला, अभिनेता म्हणाला- 'तुला वागायचं तसं वाग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 12:06 IST2024-09-20T12:05:47+5:302024-09-20T12:06:20+5:30

पॅडीने काल टास्कदरम्यान आवाज चढवल्याने सूरज चांगलाच दुखावलेला दिसला (bigg boss marathi 5)

Suraj chavan was hurt as pandharinath Paddy kamble voice was raised in front of everyone bigg boss marathi 5 | अरे बापरे! पॅडीने सर्वांसमोर आवाज चढवल्याने सूरज दुखावला, अभिनेता म्हणाला- 'तुला वागायचं तसं वाग'

अरे बापरे! पॅडीने सर्वांसमोर आवाज चढवल्याने सूरज दुखावला, अभिनेता म्हणाला- 'तुला वागायचं तसं वाग'

बिग बॉस मराठीच्या घरात दररोज नवीन भांडणं, राडे होताना दिसत आहेत. या भांडणात कधी रागाच्या भरात सदस्य एकमेकांना तोंडाला येईल ते बोलून जातात. असंच काल बिग बॉस मराठीच्या घरात घडलं. त्यामुळे घरात पुन्हा एकदा राडा झालेला दिसतोय. ही वादाची ठिणगी पडलीय पॅडी आणि सूरज चव्हाण मध्ये. एकमेकांना कायम सपोर्ट करत आलेले पॅडी आणि सूरज यांच्यात वाद रंगलेला दिसतोय. 

पॅडी आणि सूरजमध्ये वादाची ठिणगी

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो भेटीला आलाय. या प्रोमोत पाहायला मिळतं की सूरज पॅडीमुळे चांगलाच दुखावलेला दिसतो. तो अंकिताशी बेडरुम एरियात बोलताना दिसतो. अंकिता त्याला समजावताना दिसते की, "तू जर अशी किंमत करणार नाहीस तर तुझ्यासाठी कोणी उभं राहणार नाही." पुढे पॅडी सूरजची माफी मागायला येतात. मगाशी तुझ्याशी ओरडून बोललो म्हणून सॉरी असं पॅडीदादा सूरजला सांगताना दिसतात. 


पॅडी - सूरजचा वाद वाढणार

पुढे असं दिसतं की, पॅडी सूरजसाठी काहीतरी खायला घेऊन येतात. पण सूरज ते स्वीकारत नाही. तो हात जोडून नको म्हणतो. अंकिता त्याला समजावताना दिसते. पुढे पॅडी म्हणतो की, "सॉरी तुला मगाशी ओरडलो त्याबद्दल. तू याच्यापुढे काही गडबड करत असशील तर मी सांगणार नाही. तुला वागायचं तसं वाग." असं बोलून पॅडी निघून जातो. अशाप्रकारे एकमेकांना कायम सपोर्ट करणाऱ्या पॅडी-सूरजमध्ये वादाची ठिणगी पडलेली दिसतेय.

Web Title: Suraj chavan was hurt as pandharinath Paddy kamble voice was raised in front of everyone bigg boss marathi 5