'झापूक झूपूक'चे ब्रँड अॅम्बॅसेडर... सूरज चव्हाणसाठी 'बिग बॉस'ची बॅनरबाजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:02 IST2024-09-06T13:00:56+5:302024-09-06T13:02:26+5:30
एवढचं नाहीतर 'बिग बॉस'नेदेखील सूरज चव्हाणला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

'झापूक झूपूक'चे ब्रँड अॅम्बॅसेडर... सूरज चव्हाणसाठी 'बिग बॉस'ची बॅनरबाजी!
Bigg Boss Marathi Season 5 : मनोरंजनाचा बॉस असलेल्या 'बिग बॉस मराठी'चा सहावा आठवडा दणक्यात सुरू आहे. गुलीगत किंग सूरज चव्हाणने सगळ्यांना बुक्कीत टेंगूळ देत यंदाच्या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्याचा मान मिळवला आहे. सूरज चव्हाण हा 'बिग बॉस'च्या घराचा कॅप्टन झाल्याने त्याचे चाहते तर भलतेच खुश झाले आहेत. एवढचं नाहीतर 'बिग बॉस'नेदेखील सूरज चव्हाणला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
सूरज चव्हाण कॅप्टन झाल्यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केलं. सूरज चव्हाणसाठी 'बिग बॉस'कडून भन्नाट बॅनरबाजी करण्यात आली आहे. बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोत जबरदस्त बॅनर पाहायला मिळालं. या बॅनरवर बिग बॉसच्या वस्तीतला दिलदार हस्ती, 'झापूक झूपूक'चे ब्रँड अॅम्बॅसेडर, असे सुरजचे डॉयलॉग पाहायला मिळत आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या ५ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये कॅप्टन पदाचे उमेदवार निवडण्यासाठी बसमध्ये बसण्याचा टास्क खेळवण्यात आला. वर्षा उसगांवकर, अंकिता प्रभू वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण हे कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी पात्र ठरले. एपिसोड प्रसारित होण्याआधी समोर आलेल्या प्रोमोनुसार, आजच्या एपिसोडमध्ये हे पाहायला मिळेल सुरज नव्या आठवड्यासाठी घराचा कॅप्टन होईल. सध्या घराच्या कॅप्टन वर्षा आहेत. आता सूरजच्या कॅप्टनसीमध्ये घरात काय-काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.