लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 10:45 IST2025-12-01T10:44:58+5:302025-12-01T10:45:27+5:30
सूरज आणि संजनाचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आता लग्नानंतर सूरज बायकोला घेऊन देवदर्शनाला गेला आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
बिग बॉस मराठी फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर सूरज चव्हाण नुकतंच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. सूरजने त्याची बालपणाची मैत्रीण असलेल्या संजनासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. शनिवारी(२९ नोव्हेंबर) सूरज आणि संजनाचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. आता लग्नानंतर सूरज बायकोला घेऊन देवदर्शनाला गेला आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
सूरज आणि संजना जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले आहेत. परंपरेनुसार सूरजने पत्नीला उचलून घेत जेजुरी गड चढला. व्हिडीओमध्ये याची झलक पाहायला मिळत आहे. त्यानंतर दोघांनी जोडीने खंडेरायाचं दर्शन घेत पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद घेतले. यावेळी सूरजचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. आता खंडेरायचं दर्शन घेतल्यानंतर सूरज आणि संजना लग्नानंतरतच्या त्यांच्या संसाराला सुरुवात करणार आहेत.
दरम्यान, सूरज हा प्रसिद्ध रीलस्टार आहे. बिग बॉस मराठी ५ मुळे त्याच्या चाहत्या वर्गात भर पडली. या पर्वाचा तो विजेतादेखील होता. त्यानंतर सूरज झापुक झुपूक या सिनेमातही दिसला होता. त्याच्या लग्नाला जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार आणि पुरुषोत्तम पाटील यांनी हजेरी लावली होती.