हलव्याचे दागिने, काळी साडी अन्...; लग्नानंतर सूरज-संजनाचा पहिला सण, अशी केली तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:24 IST2025-12-19T15:23:08+5:302025-12-19T15:24:18+5:30
सूरज आणि संजना लग्नानंतर मकरसंक्रांतीचा पहिलाच सण साजरा करत आहे. या सणासाठी सूरज आणि संजनाने खास तयारी केल्याचं दिसत आहे.

हलव्याचे दागिने, काळी साडी अन्...; लग्नानंतर सूरज-संजनाचा पहिला सण, अशी केली तयारी
'बिग बॉस मराठी ५'चा विजेता आणि रीलस्टार सूरज चव्हाण नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. सूरजने संजनासोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मोठ्या थाटामाटात त्याचा विवाहसोहळा पार पडला. सूरजच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर सूरज आणि संजना त्यांचा पहिला सण साजरा करणार आहेत.
सूरज आणि संजना लग्नानंतर मकरसंक्रांतीचा पहिलाच सण साजरा करत आहे. या सणासाठी सूरज आणि संजनाने खास तयारी केल्याचं दिसत आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. सूरजची पत्नी संजनाने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिने हलव्याचे दागिनेही घातल्याचं दिसत आहे. केसांत गजरा माळून ती सुंदर तयार झाल्याचंही दिसत आहे. व्हिडीओत पुढे संजना आणि सूरज पतंग उडवत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
संजना ही सूरजच्या मामाची मुलगी आहे. २ डिसेंबरला सूरज आणि संजनाने सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. सूरज हा लोकप्रिय रीलस्टार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात तो सहभागी झाला होता. त्याने 'बिग बॉस मराठी'च्या घरात सगळ्यांची मनं जिंकून घेतली. या पर्वाचा विजेता झाल्यानंतर सूरजच्या चाहत्या वर्गातही वाढ झाली. त्याच्या लग्नालाही चाहत्यांनी गर्दी केली होती. 'झापुक झुपूक' सिनेमातही सूरज झळकला होता.