दागिने विकून सुप्रिया पाठारेने पुन्हा सुरु केलं 'मharaj'; रेस्टॉरंट 2वेळा बंद पडण्यामागचं सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 04:11 PM2024-01-05T16:11:40+5:302024-01-05T16:12:44+5:30

Supriya pathare: सुप्रिया पाठारेने रेस्टॉरंट बंद केल्यानंतर ते पुन्हा सुरु करताना कसा स्ट्रगल करावा लागला हे सांगितलं.

Supriya Pathare had to sell jewelery for her sons hotel The actress struggled to restart 'Maharaj' | दागिने विकून सुप्रिया पाठारेने पुन्हा सुरु केलं 'मharaj'; रेस्टॉरंट 2वेळा बंद पडण्यामागचं सांगितलं कारण

दागिने विकून सुप्रिया पाठारेने पुन्हा सुरु केलं 'मharaj'; रेस्टॉरंट 2वेळा बंद पडण्यामागचं सांगितलं कारण

कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. मराठी कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या सुप्रियाने काही महिन्यांपूर्वीच मharaj हे रेस्टरंट सुरु केलं. मात्र, हे रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर अवघ्या काही काळातच सुप्रिया आणि तिच्या लेकाला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. दोन वेळा मharaj बंद करावं लागलं. अलिकडेच सुप्रियाने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मharaj दोन वेळा बंद का झालं, ते पुन्हा सुरु करण्यासाठी तिला कसा स्ट्रगल करावा लागला हे तिने सांगितलं.

सुप्रियाच्या लेकाने हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. त्यामुळे त्याने ठाण्यात मharaj हे रेस्टॉरंट सुरु केलं. पण, सारं काही सुरळीत सुरु असतानाच त्याचा स्टाफ अचानकपणे काहीही न सांगता निघून गेला. ज्यामुळे मharaj पहिल्यांदा तात्पुरत्या काळासाठी बंद करण्यात आलं. त्यानंतर सुप्रियाच्या आईचं निधन झालं ज्यामुळे पुन्हा काही दिवस मharaj बंद करावं लागलं. त्यानंतर पुन्हा मिहीर आणि सुप्रियाने जोमाने रेस्टरंट सुरु केलं तर मिहीरच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अशी एक ना एक संकटं त्यांच्यावर येत होती. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि रेस्टॉरंट पुन्हा सुरु करण्यासाठी सुप्रियाल चक्क तिचे दागिने विकले.

दोन वेळा हॉटेल बंद झाल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. बरं या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना पुन्हा रेस्टॉरंट सुरु करणं गरजेचं होतं. परंतु, या सगळ्यात त्यांना इतका लॉस झाला होता की पुन्हा रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी त्यांना मोठं भांडवलं लागणार होतं. परंतु, दुसऱ्यांसमोर हात पसरण्यापेक्षा तिने स्वत:चे दागिने विकण्याचा निर्णय घेतला.

नेमकं काय म्हणाली सुप्रिया?

"यावेळी मी माझे सगळे दागिने विकून सगळ्या गोष्टी केल्या. कारण, आलेल्या संकटातून बाहेर पडणं अशक्य होतं. कोणाकडून पैसे घ्यायचे? मग आपलं सगळं व्यवस्थित करायचं ते ठीक आहे. पण, असे किती महिने काढावे लागणार याचा अंदाज मला नव्हता. त्यामुळे ज्याच्याकडून पैसे घेतलेत त्याला तरी किती वेळ तंगवत ठेवायचं, हे मला पटत नव्हतं", असं सुप्रिया म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी माझं स्त्री धन गहाण टाकलं याचं मला दु:खही नाहीये. कारण, ते माझं स्वप्न आहे माझ्या मुलाचं स्वप्न आहे त्यामुळेच मी ते केलं. माझ्या घरच्यांचीही साथ आहे."

दरम्यान, सुप्रियाचा लेक मिहीर याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. त्यामुळे मharaj च्या माध्यमातून मिहीरने त्याची पाककलेची आवड जोपासली. मिहीरच्या या रेस्टरंटची पावभाजी ही स्पेशालिटी आहे. त्याचसोबत तो इतरही पदार्थ खवय्यांना खायला घालतो.
 

Web Title: Supriya Pathare had to sell jewelery for her sons hotel The actress struggled to restart 'Maharaj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.