'बिग बॉस १७' च्या घरातून बाहेर पडताच 'तहलका' उर्फ सनी आर्याचं सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 11:46 IST2023-12-03T11:39:20+5:302023-12-03T11:46:37+5:30

'बिग बॉस १७' च्या घरातील नियमांचे उल्लंघन केल्याने 'तहलका' उर्फ सनी आर्याला बाहेर काढण्यात आलं आहे.

Sunny Arya's celebration after leaving the Bigg Boss house; video viral | 'बिग बॉस १७' च्या घरातून बाहेर पडताच 'तहलका' उर्फ सनी आर्याचं सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल

'बिग बॉस १७' च्या घरातून बाहेर पडताच सनी आर्याचं सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल

नुकतेच 'बिग बॉस १७' च्या घरातून 'तहलका' उर्फ सनी आर्याला बाहेर काढण्यात आलं आहे. सनीला घरातून बाहेर काढण्याचे कारण म्हणजे त्याने 'बिग बॉस १७' च्या घरातील एका महत्त्वाच्या नियमाचे उल्लंघन केले होते. घरातून बाहेर पडल्यानंतर सनीने जोरदार सेलिब्रेशन केले आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

'बिग बॉस १७'मध्ये दीड महिना घालवल्यानंतर सनी आर्या शोमधून बाहेर पडला. बाहेर आल्यानंतर त्याने आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली. सनीने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात तो जोमात नाचताना दिसत आहे.

'बिग बॉस १७' च्या घरातील स्पर्धक अरुण आणि सनीचे एक पोस्टर व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सनीने लिहले, 'जय आणि वीरुची जोडी, अरुण तुझ्यासाठी मी जीव द्यायलाही तयार आहे'. या व्हिडीओवर चाहत्यांनी त्यांच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. 

'बिग बॉस १७' च्या घरात सनी आणि अरुण यांची जोडी जमली होती. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. सनी आर्याला शोमधून बाहेर काढल्यानंतर अरुण ढसाढसा रडताना दिसला होता. त्याने कॅमेऱ्यासमोर हात जोडून सनीला बाहेर न काढण्याची विनंती बिग बॉसला केली होती. सनी आर्याबद्दल बोलायचे झाल्यास तो सोशल मीडिया इन्फल्यूएंसर आहे.  प्रँक स्टार म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याचे प्रँक व्हिडीओ लोकांना खूप आवडतात. 
 

Web Title: Sunny Arya's celebration after leaving the Bigg Boss house; video viral