लॉकडाऊनदरम्यान सतत या गोष्टी करतोय सुनिल ग्रोवर, व्हिडीओ होतायेत तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 19:38 IST2020-04-22T19:37:24+5:302020-04-22T19:38:06+5:30
लॉकडाऊनमध्ये आपल्या चाहत्यांचे आणि फॉलोअर्सचे मनोरंजन करण्यासाठी सुनीलने यापूर्वीच अजय देवगन आणि आमिर खानच्या मिमिक्रीचे व्हिडिओ शेअर केले आहेत. सोबतच काही हॉरर व्हिडिओही शेअर केले आहेत.

लॉकडाऊनदरम्यान सतत या गोष्टी करतोय सुनिल ग्रोवर, व्हिडीओ होतायेत तुफान व्हायरल
कुणी निंदा कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा म्हणत कॉमेडीयन सुनिल ग्रोवर नेहमीच रसिकांचं मनोरंजन करतो. रसिकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे सुनिल ग्रोवर. लॉकडाऊन दरम्यानदेखील तो निवांत न बसता रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी विविध गोष्टी करताना दिसतोय. सारेच घरात बंदिस्त असताना सुनिल विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करत आहे. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात. कोणतंही स्कीट सादर करताना त्याची एनर्जी रसिकांची नेहमीच पसंतीची पावती मिळवून जाते.
सुनिल सोशल मीडियावरही तितकाच अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो. असाच एक व्हिडीओ त्याने नुकताच शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये तो गमछा बांधून आणि त्यात एक छोटा फोन ठेवून बोलत आहे. व्हिडिओमध्ये सुनील कुणाला तरी लॉकडाऊनचा त्याचा दुसरा टप्पा कसा जातोय हे सांगत आहे. व्हिडीओथ तो स्वतःलाच प्रश्न विचारतो - काय केले आज... त्यावर सुनील म्हणतो, सकाळी उठलो आणि एक कप चहा घेतला. अशाप्रकारे, तो चारदा हेच बोलतो. आणि शेवटी म्हणतो आता हे चार कप धुवायचे आहेत आणि पुन्हा एकदा एक कप चहा पितो.लॉकडाऊनमध्ये आपल्या चाहत्यांचे आणि फॉलोअर्सचे मनोरंजन करण्यासाठी सुनीलने यापूर्वीच अजय देवगन आणि आमिर खानच्या मिमिक्रीचे व्हिडिओ शेअर केले आहेत. सोबतच काही हॉरर व्हिडिओही शेअर केले आहेत.