सुनील ग्रोव्हरने सुरु केला नवा 'बिझनेस'? रस्त्याच्या कडेला उभं राहून केली कपड्यांना इस्त्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 11:00 IST2026-03-22T10:59:23+5:302026-03-22T11:00:03+5:30

Sunil grover: याआधीही त्याने हँडपंपवर कपडे धुणे, मार्केटमध्ये भाजी विकणे, मक्याचे कणीस विकणे, धाब्यावर भाकरी थापणे असे अनेक मजेशीर शेअर केले आहेत.

sunil-grover-ironing-clothes-roadside-funny-video-viral-fans-reactions | सुनील ग्रोव्हरने सुरु केला नवा 'बिझनेस'? रस्त्याच्या कडेला उभं राहून केली कपड्यांना इस्त्री

सुनील ग्रोव्हरने सुरु केला नवा 'बिझनेस'? रस्त्याच्या कडेला उभं राहून केली कपड्यांना इस्त्री

सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे असंख्य फोटो आणि व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. यात काही कलाकार त्यांच्या खास अंदाजामुळे चर्चेत येतात. सध्या नेटकऱ्यांमध्ये अशाच एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. हा अभिनेता त्यांच्या अतरंगी अंदाजामुळे कायम चर्चेचा विषय ठरत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा चक्क कपडे इस्त्री करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर सध्या लोकप्रिय अभिनेता आणि विनोदवीर सुनील ग्रोवर (Sunil grover)  याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सुनील रस्त्याच्या कडेला असलेल्या इस्त्रीच्या दुकानात कपड्यांना इस्त्री करतांना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सुनीलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचा हा नवा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सुनील एकदम परफेक्टपणे कपडे प्रेस करत आहे. सगळ्यात आधी कपड्यांवर पाणी शिंपडणे, मग कोळश्याची इस्त्री त्यावर फिरवणे हे काम तो एकदम परफेक्ट पद्धतीने करत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने  'कौन है, तेरा मुसाफिर' हे जुनं गाणं बॅकग्राऊंडला प्ले केलं आहे.

दरम्यान, याआधीही त्याने हँडपंपवर कपडे धुणे, मार्केटमध्ये भाजी विकणे, मक्याचे कणीस विकणे, धाब्यावर भाकरी थापणे असे अनेक मजेशीर शेअर केले आहेत. सुनील ग्रोव्हर हा कॉमेडी अभिनेता आहे. द कपिल शर्मा शोने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. या शोमधील त्याची गुथ्थी ही भूमिका गाजली होती. काही सिनेमांमध्येही तो दिसला आहे.
 

Web Title : सुनील ग्रोवर का नया 'बिजनेस'? सड़क किनारे कपड़ों पर इस्त्री करते दिखे!

Web Summary : कॉमेडियन सुनील ग्रोवर का सड़क किनारे कपड़ों पर इस्त्री करते हुए वीडियो वायरल हो रहा है। वह पानी छिड़ककर और कोयले की इस्त्री का उपयोग करके पूरी तरह से कपड़े प्रेस करते हैं। अपनी अतरंगी शैली के लिए जाने जाने वाले ग्रोवर ने पहले कपड़े धोने, सब्जियां बेचने और भाकरी बनाने के वीडियो साझा किए थे।

Web Title : Sunil Grover's new 'business'? Ironing clothes on the roadside.

Web Summary : Comedian Sunil Grover's video of ironing clothes at a roadside shop is viral. He perfectly presses clothes, sprinkling water and using a coal iron. Known for his quirky style, Grover previously shared videos of washing clothes, selling vegetables, and making bhakri.