Video: साध्याभोळ्या गौरीने बेधुंद होऊन केला डान्स; गिरीजाचा व्हिडीओ पाहून चाहते सैराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 19:01 IST2023-02-28T19:00:39+5:302023-02-28T19:01:41+5:30

Girija prabhu:गिरीजा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते.

sukh mhanje nakki kya asta fame girija prabhu dance video viral | Video: साध्याभोळ्या गौरीने बेधुंद होऊन केला डान्स; गिरीजाचा व्हिडीओ पाहून चाहते सैराट

Video: साध्याभोळ्या गौरीने बेधुंद होऊन केला डान्स; गिरीजाचा व्हिडीओ पाहून चाहते सैराट

'सुख म्हणजे नक्की काय असतं' (sukh mhanje nakki kay asta) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू (girija prabhu).  या मालिकेत साध्या सोज्वळ गौरीची भूमिका साकारुन गिरीजाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यामुळेच सोशल मीडियावर आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. म्हणूनच, या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सोशल मीडियावर कायम तिच्याविषयीची अपडेट शेअर करत असते. विशेष म्हणजे यावेळी गिरीजाने एक हटके डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

गिरीजा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते. त्यामुळे कोणताही नवा ट्रेंड आला की त्यावरच्या पोस्ट ती शेअर करत असते. यात अलिकडेच तिने एक हटके डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

गिरीजाने हर्षदीप कौर आणि बेन्नी दयाल यांच्या उफ्फ् या गाण्यावर बेधूंद होऊन डान्स केला आहे. गिरीजा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून चाहत्यांमध्ये तिची कमालीची क्रेझ आहे. त्यामुळेच तिचा हा डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
 

Web Title: sukh mhanje nakki kya asta fame girija prabhu dance video viral