मंदार जाधवच्या लहानग्या मुलांना पाहिलंत का? पाहा जाधव कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 11:45 IST2022-04-03T11:45:10+5:302022-04-03T11:45:34+5:30

Mandar jadhav: गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या गुढीपाडवा सेलिब्रेशनचे, कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले. यात अभिनेता मंदार जाधवनेदेखील त्याच्या कुटुंबासोबत पाडवा साजरा केला.

sukh mhanje nakki kay asta fame actor mandar jadhav share family photo | मंदार जाधवच्या लहानग्या मुलांना पाहिलंत का? पाहा जाधव कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो

मंदार जाधवच्या लहानग्या मुलांना पाहिलंत का? पाहा जाधव कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर आहे. एकत्र कुटुंब पद्धती, घरातील प्रत्येक नात्यातील प्रेम, हेवेदावे असं सारं काही या मालिकेत पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यातही या मालिकेतील जयदीपला विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत अभिनेता मंदार जाधव याने जयदीपची भूमिका साकारली आहे. मंदार कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय असून अलिकडेच त्याने त्याचा फॅमिली फोटो शेअर केला आहे.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या गुढीपाडवा सेलिब्रेशनचे, कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले. यात अभिनेता मंदार जाधवनेदेखील त्याच्या कुटुंबासोबत पाडवा साजरा केला. यावेळी त्याने त्याच्या कुटुंबासोबतच एक फोटो शेअर केला आहे.

मंदारने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुलं दिसून येत आहेत. विशेष म्हणजे त्याच्या दोन्ही मुलांना चाहत्यांनी पाहिल्यानंतर कमेंटचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. Jadhav's, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

दरम्यान, मंदारप्रमाणेच त्याची पत्नी मितिका शर्मादेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केल्याचं सांगण्यात येतं. मितिकादेखील अनेकदा मंदार आणि त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Web Title: sukh mhanje nakki kay asta fame actor mandar jadhav share family photo