किती गोड...! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मिनाक्षी राठोडने शेअर केला लेकीचा क्यूट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 18:27 IST2022-06-26T18:27:17+5:302022-06-26T18:27:38+5:30

Marathi Actress Meenakshi Rathod daughter: ध्या मिनाक्षीनं शेअर केलेला एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो आहे मिनाक्षीच्या लेकीचा...

Sukh Mhanje Nakki Kay Asata Fame Devaki aka Meenakshi Rathod shared photo of daughter | किती गोड...! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मिनाक्षी राठोडने शेअर केला लेकीचा क्यूट फोटो

किती गोड...! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मिनाक्षी राठोडने शेअर केला लेकीचा क्यूट फोटो

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’  (Sukh Mhanje Nakki Kay Asata ) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेनं आणि त्यातील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत देवकीच्या भूमिकेतून अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod ) घराघरात पोहचली. नुकतंच तिला कन्यारत्न झालं.  ती सध्या प्रसुती रजेवर आहे. या मालिकेत तिच्याजागी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी पाहायला मिळते आहे. दरम्यान सध्या मिनाक्षीनं शेअर केलेला एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो आहे मिनाक्षीच्या लेकीचा.


होय, यात मिनाक्षीची चिमुकली लेक  कमालीची क्यूट दिसतेय. ‘के तू हंस के innocent सी शकल बनाये आय हाय ओ cutie pie ’, असं कॅप्शन देत मिनाक्षीने हा फोटो शेअर केला आहे.
या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. क्यूट, लय भारी, आई गं कित्ती गोड, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

मीनाक्षी राठोडने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मालिकेव्यतिरिक्त ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत मीनाक्षीने पंचबाईची भूमिका साकारली होती. मालिकाच नाहीतर सिनेमातही ती झळकली आहे. नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ’ सिनेमातही ती दिसली आहे. मीनाक्षीचा पती कैलास हा सुद्धा अभिनेता आहे. दोघांनी एकत्र काही नाटकातही काम केले आहे. कैलास ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात झळकला आहे. या सिनेमा आधी शिवाजी ‘अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला’ या गाजलेल्या नाटकात त्याने कट्टर मावळ्याची भूमिका निभावली होती.

Web Title: Sukh Mhanje Nakki Kay Asata Fame Devaki aka Meenakshi Rathod shared photo of daughter