माधवी निमकरनंतर 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण; मुंबईतील नव्या फ्लॅटमध्ये केला गृहप्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:24 IST2025-11-03T17:24:11+5:302025-11-03T17:24:41+5:30
'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याने नुकतंच त्याच्या मुंबईतील नव्या आणि हक्काच्या घरात गृहप्रवेश करत त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्याच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ समोर आला आहे.

माधवी निमकरनंतर 'सुख म्हणजे नक्की...' फेम अभिनेत्याचं घराचं स्वप्न पूर्ण; मुंबईतील नव्या फ्लॅटमध्ये केला गृहप्रवेश
मुंबईत स्वत:चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कित्येक कलाकारांनी त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. आता आणखी एका मराठी अभिनेत्याचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेत्याने नुकतंच त्याच्या मुंबईतील नव्या आणि हक्काच्या घरात गृहप्रवेश करत त्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्याच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ समोर आला आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम माधवी निमकर हिने काही दिवसांपूर्वीच मुंबईत दुसरं घर घेतल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता माधवीपाठोपाठ 'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम कपिल होनरावने चाहत्यांना खुशखबर दिली होती. कपिलने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत घर खरेदी केलं होतं. आता त्याने त्याच्या या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. व्हिडीओत कपिल पत्नीसह घराची पूजा करताना दिसत आहे.
कपिलचं हे घर मुंबई़तील अंधेरी या प्राइम लोकेशनवर आहे. व्हिडीओत त्याच्या घराची झलकही दिसत आहे. गावाहून मुंबईत आल्यानंतर अंधेरीत १० बाय १०च्या खोलीत राहणाऱ्या कपिलने स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आता त्याचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. त्याच्या या घराची किंमत ही कोटींच्या घरात आहे.