ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:37 IST2025-06-25T11:35:11+5:302025-06-25T11:37:33+5:30

मालिकेचं नावही कॉपीच? नेटकऱ्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

subodh bhave and tejashri pradhan starrer new serial is remake of bade achhe lagte hain audience disappointed | ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज

ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज

सुबोध भावे (Subodh Bhave) आणि तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कालच मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला. 'वीण दोघांतली ही तुटेना' असं मालिकेचं नाव आहे. तेजश्री स्वानंदीच्या भूमिकेत आहे तर सुबोध भावे समरची भूमिका साकारणार आहे. प्रोमो पाहूनच एकूणच मालिकेच्या विषयाचा अंदाज येतो. मात्र ही मालिका एका गाजलेल्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे हे प्रेक्षकांनी हेरलं असून त्यावरुन प्रोमोवर अनेक कमेंट्सही केल्या आहेत.

काही ओरिजनल आहे का?

मालिकेचं नाव 'वीण दोघांतली ही तुटेना' असं आहे. झी मराठीवरीलच 'खुलता कळी खुलेना' या गाण्याचं गाजलेल्या टायटल साँगमधलंच हे वाक्य आहे. त्यामुळे नावही दुसरं मिळालं नाही अशी कमेंट काहींनी केली आहे. तसंच मालिकेच्या प्रोमोमध्ये तेजश्री (स्वानंदी) आणि सुबोध (समर) हे आपल्या भावाबहिणीच्या एकमेकांशी लग्न करतात असं दाखवण्यात आलं आहे. यावरुन ही मालिका तर 'बडे अच्छे लगते है' या लोकप्रिय हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं लक्षात येतं. हिंदी मालिकेत राम कपूर आणि साक्षी तन्वर यांनी भूमिका साकारली होती. त्यामुळे पुन्हा ओरिजनल काहीच नाही म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


नेटकऱ्यांच्या कमेंट्स

'सीरियल बडे अच्छे लगते है आणि म्युझिक खुलता कळी खुलेना, ओरिजनल काय आहे का','जोडी अजिबात खास नाही, सुबोधला तेजू शोभत नाही','आपल्याकडे एवढे टॅलेंटेड कलाकार असून तुम्ही रिमेक करताय? काहीतरी ओरिजनल असेल अशी अपेक्षा होती','तुमच्याकडे कोणी नवीन कलाकार नाही का? काय सारखं तेच लोक घेता बोरिंग','यांच्याकडे नव्या कल्पनात नाही..जवळपास सगळ्याच मालिका रिमेक किंवा कॉपी आहेत. २० वर्षांपूर्वी भारतात खूप छान मालिका असायच्या'.

Web Title: subodh bhave and tejashri pradhan starrer new serial is remake of bade achhe lagte hain audience disappointed