घटस्फोटानंतर डिप्रेशन, मग लिव्हरचा गंभीर आजार; ३७ वर्षीय मयांक पवारचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 09:59 IST2026-02-26T09:58:52+5:302026-02-26T09:59:23+5:30
'एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला ७' फेम मयांक पवारचं सोमवारी(२३ फेब्रुवारी) निधन झालं. त्याच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्याच्या निधनाचं नेमकं कारण समोर आलेलं नव्हतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून मयांक यकृताच्या आजाराने ग्रस्त होता, असं त्याच्या आईने सांगितलं आहे.

घटस्फोटानंतर डिप्रेशन, मग लिव्हरचा गंभीर आजार; ३७ वर्षीय मयांक पवारचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?
'एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला ७' फेम मयांक पवारचं सोमवारी(२३ फेब्रुवारी) निधन झालं. त्याच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अवघ्या ३७व्या वर्षी मयांकने अखेरचा श्वास घेतला. फिटनेस फ्रिक असलेल्या मयांकचं अचानक निधन कसं झालं? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्याच्या निधनाचं नेमकं कारण समोर आलेलं नव्हतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून मयांक यकृताच्या आजाराने ग्रस्त असल्याचं त्याच्या आईने सांगितलं आहे.
मयांकची आई रजनी यांनी वन इंडियाशी बोलताना त्याच्या आजारपणाबद्दल खुलासा केला. मयांक गेल्या काही वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होता, असं त्यांनी सांगितलं. "घटस्फोटानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता. गेल्यावर्षी(२०२५) मार्च महिन्यात त्याला यकृताच्या गंभीर आजाराचं निदान झालं होतं. उपचारांसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण, तो त्यातून पूर्णपणे बरा झाला नाही. तो खूप मानसिक तणावात असायचा. एकटेपणा आणि उदासीनता याचा सामना तो करत होता", असं रजनी यांनी सांगितलं.
"माझा मुलगा खूप मेहनती होता. फिटनेस म्हणजे त्याचं जीवन होतं. पण घटस्फोट झाल्यानंतर तो आतून पूर्णपणे तुटून गेला होता. लिव्हरच्या आजाराने त्याला खूप त्रास झाला. आम्ही खूप प्रयत्न केले. पण काहीच झालं नाही", असं म्हणत मयांकच्या आईने दु:ख व्यक्त केलं आहे. २०१४ मध्ये मयांकचा घटस्फोट झाला होता. त्याचा मृत्यू लिव्हर खराब झाल्याने झाला का? याबाबत अद्याप कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. १ जानेवारीलाच मयांकने त्याचा ३७वा बर्थडे साजरा केला होता.