आपण त्याच्या बोलण्यात यायचे नाही, सोनाली पाटील मीनलमध्ये रंगतेय चर्चा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 19:19 IST2021-11-09T19:17:27+5:302021-11-09T19:19:09+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन सदस्यांमध्ये विकासबद्दल चांगलचं गॉसिपींग सुरु आहे. सहसा विकासबद्दल कोणी काही बोलतं आहे हे कमीच बघायला मिळतं कारण बहूतांशी तोच बोलताना दिसतो.

आपण त्याच्या बोलण्यात यायचे नाही, सोनाली पाटील मीनलमध्ये रंगतेय चर्चा !
बिग बॉस शोचं स्वरूप, घरातले वाद, भांडणं काही नवीन नाही. रसिकांना हे नाव चांगलंच माहिती आहे. बिग बॉसच्या घरातील आगामी आठवडा वेगळा ठरणार आहे. कारण घरात सध्या घडामोडी पाहून हा शो आता आणखी रंजक वळणार येणार असंच दिसतंय. सध्या या शोमुळे सहभागी झालेल्या स्पर्धकांची प्रचंड चर्चा होत आहे.बिग बॉसचं घर हे फुल ऑफ सरप्राईज आहे असंही म्हटलं जातं कारण इथं कधी कोण काय बोलेल किंवा कधी क्षणात नाती बदलतील याचा नेम नाही. बिग बॉसच्या घरात सगळ्याच स्पर्धकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन सदस्यांमध्ये विकासबद्दल चांगलचं गॉसिपींग सुरु आहे. सहसा विकासबद्दल कोणी काही बोलतं आहे हे कमीच बघायला मिळतं कारण बहूतांशी तोच बोलताना दिसतो. विकासच्या ग्रुपमधील सोनाली आणि मीनल त्याच्याबद्दल बोलताना दिसणार आहेत. तुम्हांलाही वाटतं का विकास समोरच्याला बाटलीत उतरवतो? मीनल सोनालीला सांगताना दिसणार आहे, मी कितीवेळा म्हणाले तिकडे एकेकाने बोला, ट्राय करा, प्र्त्येकाशी मुद्देसूद बोला. जे विकासने केलं. सगळेमुद्दे बरोबर नाही बोलला तो पण त्याने तुला माहिती आहे ना तो बोलण्यामध्ये उतरवतो समोरच्याला बाटलीमध्ये तसं तो करत होता.
सोनालीचे म्हणणे पडले, माझं काय मत आहे माहिती आहे त्याचं बाटलीमध्ये उतरवण आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, पण आपण बाटलीमध्ये त्याच्या उतरायचे नाही ही तर गोष्ट खरी आहे. काल बोलता बोलता तू बोलीस तू त्याचा जो प्लस पॉइंट आहे तो आपण आपल्यासाठी कसा प्लस करू शकतो वेळ आल्यावर आपल्यासाठी मायनस कसा होऊ शकतो.........”आणि दोघींच्या गप्पा अशाच सुरू राहिल्या.