बांदेकरांची सून Fix! पूजा बिरारीच्या फोटोवर सोहम बांदेकरची 'दिल'वाली कमेंट, अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 12:53 IST2025-10-22T12:51:11+5:302025-10-22T12:53:08+5:30
सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारी लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. बांदेकरांच्या घरच्या गणपतीच्या एका व्हिडीओमध्ये पूजाची झलकही दिसली होती. तेव्हापासूनच सोहम आणि पूजाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बांदेकरांची सून Fix! पूजा बिरारीच्या फोटोवर सोहम बांदेकरची 'दिल'वाली कमेंट, अभिनेत्री म्हणाली...
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार आहेत. बांदेकरांचा लेक सोहम लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. खुद्द सुचित्रा बांदेकरांनीच लेकाच्या लग्नाबाबत सांगितलं होतं. सोहम आणि अभिनेत्री पूजा बिरारी लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. बांदेकरांच्या घरच्या गणपतीच्या एका व्हिडीओमध्ये पूजाची झलकही दिसली होती. तेव्हापासूनच सोहम आणि पूजाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
आता सोहमने पूजा बिरारीच्या फोटोंवर कमेंट केली आहे. पूजाने तिच्या कुटुंबीयांसोबतचे दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजाचे आईबाबाही दिसत आहेत. हे फोटो शेअर करत पूजाने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पूजाच्या या फोटोंवर सोहम बांदेकरने कमेंट केली आहे. सोहमने हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तर सोहमच्या कमेंटला पूजानेही हार्ट इमोजीनेच रिप्लाय दिला आहे. त्यामुळे बांदेकरांची सून पूजा बिरारीच होणार असल्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.
दरम्यान, पूजा बिरारीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'स्वाभिमान' मालिकेतून पूजा घराघरात पोहोचली. सध्या ते 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. पूजा किंवा सोहमने अद्याप त्यांच्या लग्नाच्या चर्चांबाबत कोणतंही थेट भाष्य केलेलं नाही.