सासूच्या सांगण्यावरुन लग्नानंतर सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी थाटणार वेगळा संसार? कपलने खरेदी केलं नवं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:57 IST2025-12-15T11:57:01+5:302025-12-15T11:57:26+5:30
सोहमने अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पण, लग्नानंतर लगेचच सोहम आणि पूजा वेगळे राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे.

सासूच्या सांगण्यावरुन लग्नानंतर सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी थाटणार वेगळा संसार? कपलने खरेदी केलं नवं घर
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल असलेल्या आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. सोहमने अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पण, लग्नानंतर लगेचच सोहम आणि पूजा वेगळे राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे.
सोहम आणि पूजा यांनी नुकतंच नवं घर घेतलं आहे. याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. फोटोमध्ये सोहम आणि पूजाच्या हातात नव्या घराची चावी दिसत आहे. हा फोटो शेअर करत चाहत्यांनीही सोहम आणि पूजाला नव्या घराच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण, यामुळे ते लग्नानंतर लगेचच वेगळा संसार थाटणार की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, खरं तर लग्नाआधीच सुचित्रा बांदेकर यांनी याबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं होतं.

सुचित्रा बांदेकर म्हणाल्या होत्या की "आदेशच्या आईचं असं म्हणणं होतं की लग्न झाल्यावर मुलांनी वेगळं राहायचं. तुमचा संसार तुम्ही करायचा. तुम्हाला काही लागलं तर मी आहे. मी पण त्याच कॉन्सेप्टची आहे. मी सोहमला सांगितलंय की लग्नानंतर वेगळं घर शोधा. वेगळ्या घरी मस्त मजेच राहा. आईबाबा आहेतच. तिचंही माहेर आहे. त्यामुळे तिचेही आईबाबा आहेत. एकत्र राहून रोज कचकच करायचं. मी इतकी वर्ष माझं घर सांभाळलेलं आहे. आता तुम्ही तुमचं करा".