Video: अभिजीत सावंत कळवळला, जोरात ओरडला! बिग बॉसच्या घरात टास्कदरम्यान झाली दुखापत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 15:43 IST2024-08-14T15:43:18+5:302024-08-14T15:43:55+5:30
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या आठवड्यात नवीन कॅप्टनसी कार्य झालं असून या कार्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल (bigg boss marathi 5)

Video: अभिजीत सावंत कळवळला, जोरात ओरडला! बिग बॉसच्या घरात टास्कदरम्यान झाली दुखापत
'बिग बॉस मराठी'च्या घरात नॉमिनेशन टास्क, कॅप्टनसी टास्क असे अनेक रंगतदार टास्क रंगत असतात. आज तिसऱ्या आठवड्यात घरात कॅप्टनसी कार्यासाठी नवीन टास्क रंगताना दिसणार आहे. यासाठी पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांमध्ये कॉँटे की टक्कर बघायला मिळणार आहे. कॅप्टनसी कार्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावेळी टास्कदरम्यान अभिजीत सावंतला मोठी दुखापत झालेली दिसतेय.
अभिजीत सावंतला टास्कदरम्यान झाली दुखापत
आज घरात एक भन्नाट कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. नव्या आठवड्यातील नव्या टास्कदरम्यान घरातील सदस्य चांगलाच कल्ला करताना दिसणार आहे. बोटीत बसून घराचा कॅप्टन कोण बनणार हे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये, सदस्य बोटीत बसून बोटी शोधाताना दिसत आहेत. बोटी शोधण्यासह त्यांना कॅप्टनपदाचे उमेदवार बाजूला करायचे आहेत. प्रोमोमध्ये या टास्कदरम्यान अभिजीतला दुखापत झालेली दिसून येत आहे. कॅप्टनसी टास्कमध्ये कोणता सदस्य बाजी मारणार हे काही तासांतच कळेल.
निक्कीसाठी 'बिग बॉस मराठी'च्या घरातील कच्चा लिंबू कोण असेल?
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात निक्की आणि जान्हवी त्यांना वाटत असलेल्या घरातील कच्चा लिंबूबद्दल भाष्य करताना दिसत आहेत. निक्कीसाठी 'बिग बॉस मराठी'च्या घरातील कच्चा लिंबू रॅपर आर्या जाधव आहे. निक्कीने आर्याचं नाव घेत बिग बॉसलादेखील याबद्दल सांगितलं आहे. जान्हवीनेही त्याला सहमती दर्शवलेली दिसली. या आठवड्यात योगिता, सूरज, निखिल आणि अभिजीत नॉमिनेट असून या चौघांपैकी कोण घराबाहेर जाणार हे लवकरच कळेल.