सिद्धार्थ शुक्ला सांगतोय, बालिकावधूच्या सेटवर अशा गोष्टी कधी घडल्याच नव्हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 17:10 IST2017-01-20T16:02:17+5:302017-01-20T17:10:41+5:30

बालिकावधू या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला प्रमुख भूमिकेत झळकला होता. या मालिकेनंतर त्याने खतरों के खिलाडी, इंडियाज गॉट टायलेंट यांसारख्या ...

Siddharth Shukla is telling, such things never happened at the set of girl child | सिद्धार्थ शुक्ला सांगतोय, बालिकावधूच्या सेटवर अशा गोष्टी कधी घडल्याच नव्हत्या

सिद्धार्थ शुक्ला सांगतोय, बालिकावधूच्या सेटवर अशा गोष्टी कधी घडल्याच नव्हत्या

लिकावधू या मालिकेत सिद्धार्थ शुक्ला प्रमुख भूमिकेत झळकला होता. या मालिकेनंतर त्याने खतरों के खिलाडी, इंडियाज गॉट टायलेंट यांसारख्या कार्यक्रमात काम केले. छोट्या पडद्यानंतर हम्पटी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातही त्याने प्रमुख भूमिका साकारली. आता तो दिल से दिल तक या मालिकेत झळकणार असून या मालिकेत रश्मी देसाई आणि जस्मिन भसीनदेखील प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेची कथा चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटाप्रमाणे आहे. 
सिद्धार्थ बालिकावधू या मालिकेमुळे नावारूपाला आला. पण या मालिकेच्या सेटवर तो प्रचंड नखरे करत असल्याच्या चर्चा पूर्वी ऐकायला येत असत. पण या सगळ्या गोष्टी चुकीच्या असल्याचे सिद्धार्थने नुकत्याच एका मुलाखतीत म्हटले आहे. तो सांगतो, "मी बालिकावधूच्या सेटवर सगळ्यांना सतवत असे, कोणाशी चांगल्या प्रकारे वागत नसे अशाप्रकारच्या बातम्या कोणी पसरवल्या आहेत हे अद्याप तरी मला कळलेले नाही. माझ्यासाठी बालिकावधू ही मालिका खूप महत्त्वाची होती. कारण याच मालिकेतील शीव या व्यक्तिरेखेने मला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्यामुळे या मालिकेच्या बाबतीत मी अशाप्रकारे वागणे शक्यच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सेटवर सगळ्यांना नाटकं केली असती तर कलर्स या वाहिनीने मला पुन्हा त्यांच्या कोणत्याही मालिकेत घेतले नसते. बालिकावधूनंतर खतरो के खिलाडी, इंडियाज गॉट टायलेंट आणि आता दिल से दिल तक ही मालिका मी याच वाहिनीसोबत करत आहे. मी वाईट वागत असतो तर कलर्स या वाहिनीने मला पुन्हा पुन्हा त्यांच्या मालिकांमध्ये संधी दिली नसती."


Web Title: Siddharth Shukla is telling, such things never happened at the set of girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.