Siddhaanth Surryavanshi : अभिनेता सिद्धांत जिममध्ये व्यायाम करताना कोसळला आणि...., आता व्हायरल होतेय त्याची शेवटची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 05:43 PM2022-11-11T17:43:08+5:302022-11-11T17:58:16+5:30

Siddhaanth Vir Surryavanshi Death: : टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याच्या अकाली निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्व हादरलं आहे. सिद्धांत जिममध्ये वर्कआऊट करत होता. वर्कआऊट करताना त्याला  हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला....

Siddhaanth Vir Surryavanshi Death last instagram post went viral | Siddhaanth Surryavanshi : अभिनेता सिद्धांत जिममध्ये व्यायाम करताना कोसळला आणि...., आता व्हायरल होतेय त्याची शेवटची पोस्ट

Siddhaanth Surryavanshi : अभिनेता सिद्धांत जिममध्ये व्यायाम करताना कोसळला आणि...., आता व्हायरल होतेय त्याची शेवटची पोस्ट

googlenewsNext

टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhaanth Vir Surryavanshi ) याच्या अकाली निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्व हादरलं आहे. सिद्धांत जिममध्ये वर्कआऊट करत होता. वर्कआऊट करताना त्याला  हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सिद्धांत केवळ 46 वर्षांचा होता. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अशात त्याची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होतेय.

सिद्धांत सोशल मीडियावर बराच अ‍ॅक्टिव्ह होता. व्यायामाची त्याला आवड होती. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर्कआऊट करतानाचे त्याने अनेक फोटो व व्हिडीओ आहेत. त्याची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट ही सुद्धा फिटनेसबद्दलचीच होती.

सिद्धांतने काही दिवसांपूर्वी शेअर केलेली पोस्ट ही प्रमोशनल पोस्ट होती. यात त्याने चाहत्यांना खास संदेश दिला होता. ‘माझ्या तीन जीवनावश्यक गोष्टी. मी कामावर, घरी किंवा कुठेही असलो तरीही या गोष्टी न विसरता सोबत असतात....,’ असं असं त्याने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

आपल्या आहाराची, फिटनेसची इतकी काळजी घेणारा सिद्धांत वयाच्या 46 वर्षी हे जग सोडून जाईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. सिद्धांतची ही शेवटी पोस्ट वाचून त्याचे चाहते भावुक झाले आहेत. 

सिद्धांतला आनंद सूर्यवंशी या नावानंही ओळखलं जात असे. झी टीव्हीवरच्या ममता या मालिकेत त्याने साकारलेली अक्षयची भूमिका प्रचंड गाजली होती. कुसुम या मालिकेतून त्याने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. यानंतर कृष्ण अर्जुन, कसौटी जिंदगी की अशा अनेक मालिकांमध्ये तो झळकला होता. याशिवाय जमीन से आसमान तक, वह विरोध, भाग्यविधाता, क्या दिल में है अशा मालिकांमध्ये तो झळकला.

Web Title: Siddhaanth Vir Surryavanshi Death last instagram post went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.